*राष्ट्रवादी युवक काँग्रेस पंढरपूर शहर सचिव पदी संजय मुळे यांची निवड*

पंढरपूर( प्रतिनिधी)
पंढरपूर येथे श्री विठ्ठल हॉस्पिटल या ठिकाणी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश दादा पाटील व युवराज दादा पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी युवक कांग्रेस पंढरपूर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व यावेळी संजय मुळे यांची पंढरपूर शहर सचिव पदी नियुक्त करण्यात आली. यावेळी स्वप्नील जगताप, विरोधी पक्षनेते नगरसेवक सुधीर धोत्रे, सुधीर भोसले, श्रीकांत शिंदे, अरुण आसबे, बापू शिंदे श्रेयाताई भोसले, अनिताताई पवार.रणजीत पाटील विजय गायकवाड सचिन कदम, सचिन आदमिले,सुजित गायकवाड, युवराज भोसले,संतोष मते, कपिल जगताप,बंडू चव्हाण आदी उपस्थित होते.
संजय मुळे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांचा दांडगा संपर्क आहे, पुणे विभागाचे मा शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे ते विश्वासू व कट्टर समर्थक आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष म्हणून हे अतिशय चांगल्या प्रकारचे त्यांचे काम आहे. सर्वसामान्य कुटुंबातून जन्म घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजना अंतर्गत शिक्षण घेऊन जिद्दीने त्यांनी प्रत्येक गोष्ट केली हे करत असताना कधीही हार मानली नाही सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना नेहमीच त्यांचा मदतीचा हात असतो शैक्षणिक सामाजिक -राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये नेहमी ते कार्यरत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत असतात या सर्व बाबींचा विचार करून त्यांना पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव पदी निवड करण्यात आली या निवडीमुळे पंढरपूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
निवडीनंतर पुणे विभागाचे मा .शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत राष्ट्रीय विश्व गामी माध्यमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख हरिश्चंद्र गाडेकर, सोलापूर जिल्हा सल्लागार दत्तात्रय ननवरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.