*युवा नेते समाधान काळे यांचा घोंगडी बैठकीतून प्रचार* *स्वतंत्र प्रचारातून आणि विरोधकांच्या अफवा याबाबत सभासदांची समजूत काढण्याचा प्रयत्न*

पंढरपूर/प्रतिनीधी
आपले बंधू सहकार शिरोमणीचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या प्रतिष्ठेची बनलेल्या निवडणुकीत आपली सत्ता टिकवण्यासाठी युवा नेते समाधान काळे यांनी आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभी केली आहे. यामध्ये त्यांनी गावोगावी जाऊन चक्क घोंगडी बैठका घेऊन विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाचे खंडण करण्यासाठी वैयक्तिक गाटी भेटी वर जोर दिला आहे.
या घोंगडी बैठकीतून सध्या अर्थकारणातून सहकारी संस्था बळकवण्याची नवी प्रथा पंढरपूरच्या राजकारणात सक्रिय होत आहे. यातून सहकाराचा गळा घोटण्याचा प्रकार घडणार आहे. परंतु ही प्रवृत्ती रोखण्यासाठी इथला सभासद समर्थ आहे. त्यासाठी कार्यकर्त्याने दक्ष राहावे असे आवाहन समाधान काळे करत आहे.
पुढे बोलताना समाधान काळे म्हणाले की , वसंतदादा काळे यांनी चंद्रभागा सहकारी साखर कारखाना, उभारणीसाठी 14 वर्षे आपल्या हयात घालवली. वीस वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी सभासदासाठी आर्थिक उन्नती साधण्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. असल्याचे समाधानदादा काळे यांनी आवर्जून सांगितले.
समाधान काळे यांनी सोनके गार्डी गादेगाव तिसंगी अधिभागात घोंगडी बैठक बैठका घेऊन प्रत्यक्षात सभासदाच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी तपासच बांधवांनी मोठ्या जल्लोष यामध्ये स्वागत केले
यावेळी सुरेश देठे भारत कोळेकर बाबा हाके बाबा खरात सिताराम कोळेकर, बंडू पवार दादा खरात जालिंदर गोपने भारत पडळकर भागवत महा नवर तानाजी गोपने समाधान पाटील शिवाजी गोपने मधुकर हाके दत्तात्रय बंडगर पटलूपाटील मधुकर पाटील शिवाजी कोळेकर आधी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.