*पंढरपूर येथील अनुराधाताई सरवदे यांची भाजपच्या प्रदेश पातळीवर निवड*! * भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या सहसंयोजकपदी निवडीचे दिले पत्र

पंढरपूर:- प्रतिनिधी
पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या अनुराधाताई सरवदे यांची भारतीय जनता पक्षाने योग्य दखल घेतली आहे. त्यांचे कार्य पाहून त्यांना भाजपच्या प्रदेश पातळीवर स्थान देण्यात आले आहे. सरवदे यांची भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या सहसंयोजक पदी निवड आज मंगळवार दि 27 जुलै रोजी अधिकृत लेखी पत्र देऊन करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशचे प्रभारी श्रीकांत भारती,राज्याचे प्रमुख संयोजक नरेंद्र पवार यांच्या आदेशाने वरील निवड करण्यात आली असल्याचे पत्र महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ उजवला हाके यांनी अनुराधाताई सरवदे यांना दिले आहे.
सदरची निवड ही राज्यामध्ये भटके विमुक्त संघटना वाढीसाठी केली आहे. त्यामुळे हे संघटन आपण नक्की वाढवून दाखवू असा विश्वसही अनुराधाताई सरवदे यांनी व्यक्त केला आहे.