* बंडाची गुडी उभारल्याने बिनविरोधची आशा मावळली* *ॲड दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकार शिरोमणी कारखाना गेटसमोर झाले सभासदांचे बोंबाबोंब आंदोलन*

* बंडाची गुडी उभारल्याने बिनविरोधची आशा मावळली*  *ॲड दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकार शिरोमणी कारखाना गेटसमोर झाले सभासदांचे बोंबाबोंब आंदोलन*

 पंढरपूर/प्रतिनीधी

विठ्ठल परिवारातील राजकीय दुही वाढत असताना, विठ्ठल पाठोपाठ आता दुसऱ्या एका महत्वाच्या असलेल्या संस्थेची म्हणजेच सहकार शिरोमणी सह साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. यामुळे विठ्ठल परिवारात एकदम गतिमान हलचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. सत्ताधारी काळे गटाकडून या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, खुद्द भाळवणी भागातील सभासद यांनी कारखान्याचे माजी संचालक ऍड दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली ऐन गुडीपाडवा दिवशी कारखान्याच्या गेटवर बोबाबोंब आंदोलन केले. यामध्येच सभासद यांनी आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे बिनविरोधच्या चर्चेला पूर्णविराम होऊन, तेवढी आशा मावळली आहे.


नववर्षाच्या पहिल्याच म्हणजे गुढीपाडव्या दिवशी 
सहकार शिरोमणी कारखान्यासमोर आगडोंब उसळला. थकीत ऊसबिले, कामगारांच्या पगारी आणि ऊस वाहतूकदारांची बिले देण्यात यावीत, या मागणीसाठी शेतकरी कर्मचारी आणि वाहतूक ठेकेदारांनी भाळवणी येथील या कारखान्यासमोर बोंब ठोकण्याचे काम केले. गुढीपाडव्याच्या शुभदिनी 
कारखान्यासमोर झालेल्या या आंदोलनाने, पंढरपूर तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले. कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला गेला.


चालू गळीत हंगामातील शेतकऱ्यांची, ऊस वाहतूकदारांची आणि कर्मचाऱ्यांची देणी सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे थकीत आहेत. या थकीत देण्यासाठी शेतकरी आणि ऊस वाहतूक दारांनी कारखान्याच्या गेटसमोर बोंब ठोकली. गुढीपाडव्यादिवशी शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे , सहकार शिरोमणी कारखाना चांगलाच चर्चेत आला.


कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडे वारसा म्हणून हा साखर कारखाना ठेवला , परंतु त्यांनी आजवर कधीच आंदोलन केल्याशिवाय ऊस बिले दिली नाहीत. प्रचंड निष्क्रियता आजवर त्यांनी दाखवली, आता हीच निष्क्रियता त्यांना खाली खेचल्यावाचून राहणार नाही,
असा आत्मविश्वास, माजी संचालक ॲड. दीपक पवार
यांनी व्यक्त केला, यावेळी त्यांच्यासमवेत शेकडो सभासद कर्मचारी आणि वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.

*तेवीस वर्षात शेतकऱ्यांची केवळ फरफटच अन वरून बिनविरोधची भाषा*

सहकार शिरोमणी म्हणजेच चंद्रभागा साखर कारखान्याची सूत्रे वारसाने कल्याणराव काळे यांच्याकडे आली. याच प्रेमापोटी आजपर्यंत त्यांच्याकडे हा साखर कारखाना राहिला.
या काळात कल्याणराव काळे यांची निष्क्रियताच दिसून आली. आजपर्यंत त्यांनी कधीच न मागता बिले दिली नाहीत. प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना ओरड करावी लागली. आता हेच चेअरमन कल्याण काळे कारखाना बिनविरोध करण्याची भाषा बोलत आहेत. त्यांची निष्क्रियताच त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही , असे मत ॲड. दीपक पवार यांनी व्यक्त केले.