बहुजन रयत परिषदेच्या संयोजनातून अध्यात्म सप्ताह सोहळा   *हिप्परगी येथील कार्येक्रमासाठी दोन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची राहणार उपस्थिती*   *प्रदेशाध्यक्षा एडव्होकेट कोमल ढोबळे यांची माहीती *

बहुजन रयत परिषदेच्या संयोजनातून अध्यात्म सप्ताह सोहळा   *हिप्परगी येथील कार्येक्रमासाठी दोन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची राहणार उपस्थिती*   *प्रदेशाध्यक्षा एडव्होकेट कोमल ढोबळे यांची माहीती *


पंढरपूर/ प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्य बहुजन रयत परिषदेच्या संयोजनातुन बागलकोट जिल्ह्यातील श्री क्षेत्र हिप्परगी इंचगिरी मठ येथे अध्यात्म सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई , गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवर तर माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळेसर हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असल्याची माहिती बहुजन रयत परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष  ऍड कोमल ढोबळे साळुंखे यांनी दिली आहे.
इंचगिरी अध्यात्म सांप्रदायाचे श्री स.स. गिरी मल्लेश्वर महाराज यांचे परम शिष्य श्री स.स.संगमेश्वर महाराज यांचे 91 व्या पुण्यस्मरणोस्तव अध्यात्म सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.हा सोहळा कार्तिक वद्य चतुर्थी शनिवार 12 रोजी इंचगिरी सांप्रदायाचे सदगुरु श्री.स.स. प्रभुजी महाराजांच्या शुभहस्ते दासबोध विना पुजन करुन सुरुवात होणार आहे.या दिवशी वरील मंत्री महोद्य आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या सांप्रदायिक सोहळ्यासाठी सोलापुरचे खासदार जयसिध्देश्वर स्वामी श्री स.स. अदृश्य काडसिध्देश्वर महाराज, श्री सिध्देश्वर बाळासाहेब महाराज, दत्तात्रय बडे महाराज ,देविदास महाराज, खताळ महाराज, तुकाराम वाघमारे महाराज, बंडोपंत महाराज, प्रभु अकळे महाराज, काटकर महाराज , मिराताई महाराज ,मोहनानंद महाराज, आनंदसिध्द महाराज, भिमा महाराज, सच्चिदानंद महाराज, दयाघन महाराज,शंकर महाराज, शिवानंद पोरे महाराज, रेवनसिध्द व्हनमराठे महाराज, अरविंद महाराज, महिपति मोरे महाराज, पुंडलिक साठे महाराज, तानाजी फुले महाराज, श्री.स.स. शिवाजी महाराज ,श्री.स.स. सुदर्शन महाराज, आदि. उपस्थित राहणार आहेत.
कार्तिक वद्य सोमवार दिनांक 14 रोजी दुपारी 12 वाजता विमल ब्रम्ह निरुपन व फुले टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे . तरी सर्व भाविक भक्तांनी या अध्यात्मक सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ही बहुजन रयत परिषदेच्या वतीने प्रदेश अध्यक्षा कोमल ढोबळे साळुंखे यांनी केले आहे.