*लक्ष्मी टाकळीत भालके -काळे-साठे  आघाडीचे बहुमत* *मुख्यमंत्री शिंदे समर्थक महेश साठे यांच्या कुटूंबातील चार जागेवर विजय,*

*लक्ष्मी टाकळीत भालके -काळे-साठे  आघाडीचे बहुमत* *मुख्यमंत्री शिंदे समर्थक महेश साठे यांच्या कुटूंबातील चार जागेवर विजय,*


 पंढरपूर/ प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी पार पडली. त्यामध्ये परिचारक गटाला शह देत भालके-काळे आणि साठे गटाच्या आघाडीने 17 पैकी 9 जागेवर बहुमत मिळविले आहे. तर 5 जागेवर परिचारक गटाचे सदस्य विजयी झाले आहेत. उर्वरीत एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पाटीचे पंढरपूर मंगळवेढा विधान सभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप मांडवे हे अपक्ष निवडूण आले आहेत.  
या झालेल्या मतमोजणीमधून प्रभाग क्र.1 मध्ये समाधान देठे, शितल कांबळे. प्रभाग क्रं.2 मधून गोवर्धन देठे, सुरेखा  खपाले, रूक्मिणी जाधव.  प्रभाग क्र.3 मधून महादेव पवार, रूपाली कारंडे, विजयमाला वाळके. प्रभाग.क्र.4 मधून रेश्मा संजय साठे, रोहिणी महेश साठे, सागर विनायक सोनवणे. प्रभाग.क्र.5 मधून संदिप मांडवे, संजय साठे, रोहिणी साठे, प्रभाग क्र.6 मधून नंदकुमार वाघमारे, औदुबंर ढोणे, आशाबाई देवकते यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश      आहे.
या झालेल्या मत मोजणी  मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक महेश साठे यांच्या कुटूंबातील चार जागेवर निवडणुक लढविण्यासाठी उमेदवार उभे होते. यामध्ये चारही ठिकाणी विजय झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये महेश साठे यांच्या पत्नी रोहिणी महेश साठे या प्रभाग क्र.4 आणि प्रभाग क्र.5 मधून निवडणुक रिंगणात होत्या. त्यांचा वरील दोन्ही प्रभागातून विजय झाला आहे. तर महेश साठे यांचे बंधु संजय साठे हे प्रभाग क्र.5 मधून निवडणुक रिंगणात होते. तर संजय साठे यांच्या पत्नी रेश्मा संजय साठे या प्रभाग क्र.4 मधून निवडणूक रिंगणात होते. या मध्ये चारही जागेवर महेश साठे कुटूंबीयांना विजय मिळाला आहे. यामुळे यामधील एका जागेचा राजिनामा द्यावा लागणार असून रोहिणी महेश साठे या कोणत्या प्रभागातील  सदस्यत्वाचा रराजीनामा    देणार याकडे लक्ष लागूण राहिले आहे.  राष्ट्रवादीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप मांडवे प्रभाग क्र.5 मधून निवडणूक लढविली होती. ही निवडणूक लढवित असताना मांडवे यांनी भालके, काळे, आ.समाधान आवताडे, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांचा आशिर्वाद मिळवित आपल्या जागेवर विजय मिळविला आहे.

चौकट 


*लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करणार -: महेश साठे*
राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पहिल्या मेळाव्याच्या निमित्ताने लक्ष्मी टाकळी येथे आले होते. त्यामुळे आपणही त्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेला पहिलाच विजय समर्पीत करीत आहोत अशी प्रतिक्रीया महेश साठे यांनी दिली आहे. महाविकास ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून टाकळी ग्रामपंचायतीवर जनतेने विश्‍वास दाखवित जे बहुमत दिले आहे ते सार्थकी ठरविण्यासाठी जास्तीत जास्त विकास करणार असल्याचे साठे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या स्थरावर निधी मिळवित असतांना मर्यादा पडत आहेत. त्यामुळे येत्या सहा महिन्यांमध्ये या 20 हजार लोकसंख्या असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यांने मोठा निधी उपलब्ध करून या भागाचा मोठा विकास करून दाखविण्यासाठी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावू असा इशारा महेश साठे यांनी दिला आहे.