*करकंब येथील शिल्पकार-मूर्तिकार यांच्या गणेश मूर्ती साता- समुद्रापलीकडे......!* *गणेश मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात.* *करकंबच्या गणेशमूर्तींना पर राज्यासह परदेशातही क्रेझ.

करकंब /प्रतिनिधी:
- श्री गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना देशभरात श्री गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातच नव्हे पर राज्यासह परदेशातही प्रसिद्ध असलेल्या करकंब येथील गणेश मूर्तीच्या कामांना आता वेग आला असून गणेश मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. करकंब येथील मूर्तिकार व शिल्पकार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विविध गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. गतवर्षीच्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरा करता आला नसल्याने यावर्षी मात्र गणेश भक्तांनी हा गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहाने साजरा करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यंदाच्या वर्षी या गणेश चाळीस ते पन्नास टक्के गणेश मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ होणार असल्याची सोलापूर जिल्हा मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष -अरुण कुंभार यांनी सांगितले. या गणेश मूर्ती सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील व्यापारी मूर्ती खरेदीसाठी येत असतात. विशेषता या करकंबच्या शिल्पकार-मूर्तिकार यांनी बनवलेल्या सुरेख पद्धतीने रंग सजावटीने व मोहक कलाकुसरीने या मूर्तींची गणेश मूर्तीची क्रेझ.... आता परदेशातही पोहचली आहे.
डिसेंबर ते जानेवारीपासून या गणेश मूर्ती बनवण्याचे काम येथील मूर्तिकार करीत असतात. या मूर्ती चार इंचापासून ते पंधरा फुटापर्यंत बनवण्याचे काम येथील मूर्तिकार व शिल्पकार यांना करावे लागते. त्यांच्याबरोबर घरातील लोकही या मूर्ती बनवण्याच्या कामाला मदत करीत असल्याचे दिसून येते.
मूर्ती बनवण्यापासून ते या मूर्तींना रंग सजावट करण्यापर्यंत कलाकुसरीचे काम अत्यंत रेखीव व सुरेख पद्धतीने केली जात असल्याने या मूर्तींना वरचेवर वाढती मागणी होत असते. येथील सोलापूर जिल्हा मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अरुण कुंभार, नवनाथ कुंभार (सर), शिल्पकार ओंकार कुंभार, गोपाळ कुंभार नितीन कुंभार रामलिंग कुंभार मुरलीधर कुंभार चांगदेव कुंभार आदिसह मूर्तिकार बांधव हे काम केल्या अनेक महिन्यापासून करीत असून या मूर्तीमध्ये लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती, कसबा गणपती, चिंचपोकळी गणपती, सिद्धिविनायक, जय मल्हार आदी विविध गणेश मूर्ती अत्यंत सुरेख साकारल्या असल्याने महाराष्ट्र राज्यासह पर राज्यातील व्यापारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी या गणेश मूर्ती आत्तापासूनच खरेदी करण्यासाठी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या गणेश मूर्तीमध्ये पीओपी गणेश मूर्ती, गणेश मूर्ती असल्याने या गणेश मुर्ती चार इंचापासून ते पंधरा फुटापर्यंत असून करकंबच्या या गणेश मूर्तींना येथील मूर्तिकारामुळे पर राज्यासह परदेशातही क्रेझ निर्माण झाली आहे.