*करकंब येथील दिव्यांगाचे पाच टक्के निधी वाटप न झाल्याने 26 जानेवारी रोजी भीक मागो आंदोलन.*: *प्रजासत्ताक दिनी दिव्यांगाचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन*

*करकंब येथील दिव्यांगाचे पाच टक्के निधी वाटप न झाल्याने 26 जानेवारी रोजी भीक मागो आंदोलन.*: *प्रजासत्ताक दिनी दिव्यांगाचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन*

 करकंब /प्रतिनिधी

: करकंब येथील असलेल्या सर्वच ऑनलाईन दिव्यांग अपंगांना पाच टक्के सन 2000-2021 या वर्षातील निधी ग्राम विकास अधिकारी यांनी न दिल्यामुळे करकंब येथील प्रहार अपंग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य करकंब यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी दिनांक 26/1/2022 रोजी करकंब ग्रामपंचायत कार्यालय समोर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग (अपंग)संघटना ने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे

.
   सन 2020-21 या वर्षातील दिव्यांग (अपंग) कर्णबधिर ,अंध ,मूकबधिर व इतर दुर्धर अपंग असलेल्या 54 ऑनलाइन दिव्यांग अपंगांना करकंब चे ग्रामीण विकास अधिकारी डॉक्टर सतीश चव्हाण यांनी सदर पाच टक्के निधी दिला नसल्याचे या लेखी पत्रात नमूद केले आहे. सदर दिव्यांग (अपंगांनी) शासन निर्णय असतानाही ग्राम विकास अधिकारी डॉक्टर सतीश चव्हाण यांच्याकडे वारंवार पणे तोंडी तसेच लेखी मागणी करूनही सर्व कागदपत्रांची पूर्तता तसेच पाठपुरावा करूनही ही या दिव्यांगांना अद्याप पाच टक्के निधी दिला नसल्यामुळे या दिव्यांगाच्या संघटनांनी दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता भीक मागो आंदोलन करण्याचा लेखी इशारा निवेदनाद्वारे दिला आहे असे पत्रक प्रहार अपंग क्रांती संघटना सोलापूर जिल्हा करकंब शाखाध्यक्ष महेंद्र लोंढे व सचिव बाळू पेटकर यांनी काढले आहे.


 *चौकट:

याबाबत करकंब ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी डॉक्टर सतीश चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही*