*इंधनक्रांतीचा शेतकर्‍यांनी लाभ घेतला पाहिजे:- सोनवले*

*इंधनक्रांतीचा शेतकर्‍यांनी लाभ घेतला पाहिजे:- सोनवले*

पंढरपूर/प्रतीनिधी
सध्या सर्वत्र इंधनक्रांतीची म्हणजे सीएनजी व पीएनजी बाबत चर्चा होताना दिसून येत असून या इंधन क्रांतीचा संपुर्ण देशाला फायदा होणारच आहे. परंतु शेतकर्‍यांनीही एमसीएलमध्ये सहभागी होऊन त्यांच्या माध्यमातून होणार्‍या इंधनक्रांतीचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन एमसीएलच्या नंदादिप बायोफ्युएल्स प्रा.लि.चे प्रकल्प प्रतिनिधी किशोर सोनवले यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे एमसीएलच्या नंदादिप बायोफ्युएल्स प्रा.लि.च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व नेपियर घास लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन रोपळे ग्रामउद्योजक डॉ. हनुमंत खपाले यांच्यावतीने करण्यात आले होते. याप्रसंगी सोनवले बोलत होते. कार्यक्रमसाठी ग्रामउद्योजक रामचंद्र शेळके, संतोष चव्हाण, दिग्विजय बाजारे, संचालक दिनकर कदम, सरपंच शशिकला चव्हाण, उपसरपंच हनुमंत कदम, नारायण गायकवाड, ग्रा.प.सदस्य नितीन कदम,  अनिल कदम, विलास भोसले, नागनाथ माळी,  माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ, जनक भोसले, जनसेवेचे अशोक पाटोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलाताना किशोर सोनवले यांनी सांगितले कि, नंदादिप या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या शेतकर्‍यांचा चौआंगी फायदा होणार असून त्यांनी लागवड केलेला नेपियर गास काटापेमेंट स्वरूपात खरेदी केला जाणार आहे. तसेच शेतकर्‍यांच्या शेतीमधील सेंद्रीययुक्त गोष्टींची  खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडे आर्थिक सुबतता तर येणारच आहे. परंतु प्रकल्पामध्ये  होणार्‍या वार्षिक  फायद्यातील काहि रक्कम गावच्या विकास कामासाठी देण्यात  येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांबरोबर गावालाही विाकासात्मक लाभ मिळणार आहे. असे सांगितले.
यावेळी ग्रामउद्योजक डॉ .हनुमंत खपाले, रामचंद्र शेळके, संतोष चव्हाण, दिग्विजय  बाजारे, संचालक दिनकर कदम, ग्रा.प.सदस्य नितीन कदम, माजी कृषी अधिकरी मधुकर गुंजाळ, अशोक गायकवाड यांनीही मार्गदर्शन करून माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोमनाथ जगताप यांनी केले.

फोटो ओळ : नंदादिप बायोफ्युएल्सच्या रोपळे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना किशोर सोनवले, ग्रामउद्योजक , पदाधिकारी व नागरिक आदी