बचत गटाच्या हपत्यासाठी सक्ती न करण्याचे प्रांताधिकारी ढोले यांचे आदेश .*पंढरपूर तालुका मनसेने याबाबत केली होती निवेदन देउन तक्रार*
पंढरपूर :-प्रतिनिंधी
मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊन मधेही महिलांना बचत गटाच्या हप्ते भरण्यासाठी जी सक्ती केली जात होती,त्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यानी आपल्या सर्व कार्यकर्त्याना सहभागी घेऊन महिलांना त्रासातून मुक्त करुन दाखवीले होते.त्यासाठी मोर्चाचे आयोजनही करण्यात आले होते.
याच पध्दतीने सध्याही बचत गटाचे हप्ते भरण्यासाठी सध्याही अडचण निर्माण झाली असल्यामूळे याबाबत पंढरपूरचे प्रांताधिकारी याना एक निवेदन देण्यात आले होते.याची दखल घेऊन प्रांताधिकारी सचिन ढोले यानी मनसे पदाधिकारी आणि महिला बचत गटाचे वसुली प्रतिनिधी आणि आधिकारी यांची दिनांक 25 मे रोजी मीटिंग घेण्यात आली.या मिटिंग मध्ये सर्व फायनान्स यांना कोरोनाच्या महामारीमध्ये अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे अशा स्थितीमध्ये सर्व फायनान्स ने सक्तीची वसुली थांबवावी असे आदेश देण्यात आले.
यावेळी उपस्थित मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, सोशल मीडिया प्रमुख तेजस गांजाळे, सिद्धेवाडी शाखाध्यक्ष स्वप्नील जाधव यावेळी उपस्थित होते.