*पंढरीतील अपघातग्रस्त कुटुंबास समाजसेवक संजय ननवरे यांची मदत*

*पंढरीतील अपघातग्रस्त कुटुंबास समाजसेवक संजय ननवरे यांची मदत*

पंढरपूर /प्रतिनिधी

एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला, कुटुंबात कमवते कोणीही राहिले नाही, अशा कुटुंबास समाजसेवक संजय ननवरे यांची कायमच मदत होते.
पेनुर जवळील अपघातात मयत झालेल्या प्रशांत शेटे या तरुणाचे कुटुंब उघड्यावर आले, आणि संजय ननवरे यांची मदत त्या ठिकाणी पोहोचली.


गेल्या आठवड्यात पंढरपूर मोहोळ मार्गावर पेनुर नजीक कार आणि बसचा अपघात झाला होता. विजापूर गल्लीतील तीन तरुणांचा एकाच वेळी मृत्यू झाला होता . यावेळी पंढरपूरमध्ये स्मशान शांतता पसरली होती.


या अपघातात ऋषिकेश साखरे (वय २५), सुरज कदम (वय २८) आणि प्रशांत शेटे (वय ४०) हे तीन तरुण जागीच ठार झाले होते. यापैकी प्रशांत शेटे यांच्या कुटुंबात , त्याची पत्नी आणि दोन लहान मुले उघड्यावर आले आहेत. कुटुंबात कमावते कोणीही राहिले नाही. येथील एका समाजसेवकामार्फत ही माहिती संजय ननवरे यांच्यापर्यंत पोहोचली.
ननवरे यांनी किराणा दुकानात जाऊन तेल मीठ तिखट यासह कुटुंबासाठी जो किराणा माल लागतो, तो सर्व खरेदी केला , आणि शेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी मयत प्रशांत शेटे यांच्या जवळील नातेवाईक उपस्थित झाले. त्यांनी समाजसेवक संजय ननवरे यांचे आभार मानले.


समाजसेवक संजय ननवरे यांचे दातृत्व हे अशा प्रकारच्या लहान मोठ्या घटनातून पसरले आहे. पंढरपूर शहरात कोणतेही कुटुंब उपाशीपोटी राहू नये, याशिवाय कोणाही कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी त्यांचा नेहमीच कटाक्ष असतो. संजय ननवरे यांच्या या कार्याचा पंढरीत मोठा नावलौकिक पसरला आहे.

*चौकट*

पेनुर जवळील अपघातात प्रशांत शेटे (वय ४०), हा तरुण जागीच मयत झाला. पंढरपूर शहरातील विजापूर गल्लीत हा तरुण राहत होता. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन लहान मुले एवढाच परिवार शिल्लक राहिला. कमावताच गेल्याने घर उघड्यावर आले. ही गोष्ट संजय ननवरे यांच्या कानावर आली ,आणि संजय ननवरे यांनी पाच महिन्यांचा किराणा माल घेऊन, त्यांचे घर गाठले.