*करकंब नं 3 सोसायटी च्या चेअरमन पदी मारुती देशमुख यांची तर व्हा चेअरमन पदी रामेश्वर खाडे यांची बिनविरोध निवड **

करकंब/ प्रतिनिधी
येथील करकंब नं 3 विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी मारुती आण्णा सुखदेव देशमुख यांची तर व्हा चेअरमन पदी रामेश्वर काका बाजीराव खाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी ए के कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची सभा घेण्यात आली यावेळी चेअरमन पदासाठी मारुती देशमुख व व्हा चेअरमन पदासाठी रामेश्वर खाडे यांचा एक एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. मा आ प्रशांतराव परिचारक व बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ निवड ही बिनविरोध झाली होती.
याप्रसंगी संचालक शंकर देशमुख, बाळू गुळमे, अरुण व्यवहारे, विश्वनाथ मांजरे, सुलभा व्यवहारे, धनाजी गायकवाड, प्रशांत खारे आदी उपस्थित होते. निवडी नंतर मा जि प सदस्य बाळासाहेब देशमुख, पांडुरंग व्यवहारे, सुभाष गुळमे, नागनाथ मांजरे, अरुण बनकर, सतीश खारे आदींनी अभिनंदन केले.
फोटो ओळ
करकंब नं3 सोसायटी च्या चेअरमन पदी मारुती देशमुख व व्हा चेअरमन पदी रामेश्वर खाडे यांची निवडी प्रसंगी बाळासाहेब देशमुख सुभाष गुळमे, पांडुरंग व्यवहारे आदी