*सहकारास कुप्रवृत्तींचा धोका - शर्मिताताई ठाकरे* *मुंबईतील मनसे शिबिरात सहकार मंथन*

पंढरपूर (प्रतिनिधी)
*सहकार क्षेत्रात कुप्रवृत्तीचा वावर वाढला आहे.सामान्य लोकांच्या हितासाठी कार्यरत असणारे सहकार , यामुळे धोक्यात आले आहे .या प्रवृत्ती़ंचा वेळीच विरोध करा, असे आवाहन मनसे नेत्या शर्मिला राज ठाकरे यांनी केले. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या सहकार शिबिरात त्या बोलत होत्या. याप्रसंगी मनसे नेते दिलीप धोत्रे, बाळ नांदगावकर,जयप्रकाश बाविस्कर, नितीन सरदेसाई आदींसह, राज्यातील मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांच्या या सहकार शिबिरात यावेळी मोठे मंथन झाले.*
मुंबईतील चिंचपोकळी येथील सभागृहात, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेकडून कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरात शर्मिला राज ठाकरे बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते सहकार मार्गदर्शन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सध्या राज्यातील सहकार क्षेत्रात काही भ्रस्ट लोकांचा शिरकाव झाला आहे. यामुळे सहकाराची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. या प्रवृत्तींना वेळीच विरोध करणे गरजेचे आहे , अशा प्रवृत्तींना बाजूला सारल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही असे सांगून या प्रवृत्तींना वेळीच विरोध करा , असे आवाहन शर्मिलाताई ठाकरे यांनी यावेळी केले.
चौकट
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विविध सहकारी संस्था स्थापन करून , गोरगरीब जनतेला न्याय द्यावा - बाळ नांदगावकर*
*सहकाराच्या माध्यमातून महिलांना मदत करून, महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मनसेने प्रयत्न करावा - सौ .शालिनी ठाकरे*
*मुंबईत हजारो गृहनिर्माण संस्था आहेत, त्यांना मनसेच्या माध्यमातून मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे- मनसे नेते अभिजित पानसे.*
*ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून सर्वमसमान्य जनता तसेच शेतकऱ्यांना, सहकारी बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मदत करावी - जयकुमार बाविस्कर, मनसे नेते.*