*युवा भीमसेनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी अक्षय कांबळे यांची निवड*

पंढरपूर:-प्रतिनिधी
युवा भीमसेनेनेच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी येथील सेंट्रल नाका परिसरातील धडाडीचे कार्यकर्ते अक्षय कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.याबाबत अधिकृत पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास माने यांनी नुकतेच दिले आहे.
युवा भिमसेनेची स्थापना मागील काही वर्षेपासून करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील विविध भागातून विविध पदाधिकारी निवडण्यात आले आहेत. यापुढील काळात उर्वरित ठिकाणच्या नवीन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात येणार आहेत.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ,या संघटनेच्या विस्तराचे काम जोमाने सुरू आहे.
समाजामध्ये धडाडीने काम करणाऱ्या युवकांना ही संघटना संधी देत आहे. यामुळेच ही संघटना अल्पावधीतच राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाली आहे.
बहुजन चळवळीत राजकीय आणि बिगरराजकीय संघटनांना तोडीस तोड देणारी ही संघटना लवकरच विस्तारली जाणार आहे, या संघटनेकडे असलेला तरुण वर्गाचा कल पाहता, लवकरच ही संघटना नावारूपाला येणार असल्याची खात्री तरुण वर्गाकडून दिली जात आहे.
या संघटनेच्या कारकरिणी विस्ताराचे काम राज्य, जिल्हा, आणि तालुका पातळीवर नेमणुका करून लकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास माने यांनी दिली आहे