*करकब येथील सौरव देशमुख युवा मंच यांच्या वतीने 425 कुटुंबांना बेलाचे वृक्षांचे वाटप*.

*करकब येथील सौरव देशमुख युवा मंच यांच्या वतीने 425 कुटुंबांना बेलाचे वृक्षांचे वाटप*.

 करकंब /प्रतिनिधी

 पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सौरभ दादा बाळासाहेब देशमुख युवा मंच करकंब, यांच्या वतीने श्रावणी सोमवार चे औचित्य साधून करकंब येथील वार्ड क्रमांक पाच मधील 425 घरोघरी जाऊन बेलाचे वृक्षाचे वाटप करून घरासमोर वृक्षारोपण करण्यात आले.
  यावेळी पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते मारुती अण्णा देशमुख, पांडुरंग व्यवहारे, ग्रामपंचायत चे विरोधी पक्षनेते राहुल काका पुरवत, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग तात्या नगरकर, दिलीप काका व्यवहारे, राजाभाऊ देशमुख, सौरभ दादा उर्फ महेश बाळासाहेब देशमुख, प्रकाश व्यवहारे, लक्ष्मण व्यवहारे, यश कदम, कैलास जाधव,
 ओमकार कदम, निलेश व्यवहारे पांडुरंग व्यवहारे सर, पोपट घोडके, राजाराम कोरके, रमेश कोरके, विकास कोरके सचिन व्यवहारे सोमनाथ व्यवहारे ऋषिकेश वाघमारे तेजस हराळ आदीसह बहुसंख्य शेतकरी बंधू ग्रामस्थ उपस्थित होते. सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यात आली सौरव देशमुख युवा मंच ने परिश्रम घेतले.
 यावेळी सौरव देशमुख यांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांची जोपासना करून जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.