*पंढरपूरमध्ये श्री संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर वृक्षारोपण* *भाजपा नेते प्रशांत परिचारक यांची उपस्थिती*

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर शहराबाहेरून जाणाऱ्या रिंग रोडलगत
श्री संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर बुधवारी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास मा. विधान परिषद सदस्य आणि भाजपा नेते प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनसे अध्यक्ष प्रशांत गिड्डे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी केशव घोडके यांच्यासह जे. एम. म्हात्रे कंपनीचा अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
देशाचा अमृत महोत्सव 2023 सालात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सरकारने वृक्षलागवड करण्याचे धोरण स्वीकारले आहे. आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम देशभरात प्रभावीपणे राबवला जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात आहे.
पंढरपूरलगत असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर प्रत्येकी 4000 वृक्षांची लागवड करण्याचे धोरण राष्ट्रीय महामार्ग महामंडळाने स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर वाखरी हद्दीत वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम पार पडला. जे. एम. म्हात्रे या बांधकाम कंपनीचे अधिकारी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळ, जांभूळ, वड आणि चिंच इत्यादी वृक्षांची लागवड यावेळी मा. आ. प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी केशव घोडके, कन्सल्टंट अखिलेशकुमार पांडे,मा. जि. प. सदस्य नानासो गोसावी, वाखरीच्या सरपंच धनश्री साळुंखे, मा. सरपंच कविता पोरे, उपसरपंच बाळासाहेब लिंगरे, मा. उपसरपंच संग्राम गायकवाड, शिरढोणचे मा. सरपंच दत्ता कांबळे, पंतकृपा पतसंस्थेचे चेअरमन गुलाब पोरे, वाखरीचे ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत चव्हाण, विक्रम घोडके, आदींसह या या परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. जे. एम. म्हात्रे कंपनीचे जनरल मॅनेजर विजयकुमार, प्रकल्प व्यवस्थापक बीव्ही किशोर, इंजिनीयर आकाश रणदिवे, आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकल्प व्यवस्थापक निसार सिराज यांनी केले.