*काठावरचे बहुमत सत्ताधाऱ्यांना.... उपोषण करूनही माहिती मिळेना विरोधकांना...*...! *जिल्हा परिषद, पंचायत समितीत सत्ताधाऱ्यांना देणार मतदार दे धक्का.

*काठावरचे बहुमत सत्ताधाऱ्यांना.... उपोषण करूनही माहिती मिळेना विरोधकांना...*...! *जिल्हा परिषद, पंचायत समितीत सत्ताधाऱ्यांना देणार मतदार दे धक्का.

करकंब/ प्रतिनिधी
नुकत्याच सात आठ महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी गटाला नऊ तर विरोधी पक्ष नेते राहुल पुरवत यांना आठ जागा मिळाल्या होत्या. करकंब नागरी वस्ती तसेच वाड्या वस्ती येथील मतदारांनी काठावरचे बहुमत दिल्याने ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत च्या माध्यमातून कारभार करणारी मंडळींना आगामी येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीमध्ये नगरपंचायत च्या प्रश्नावरून तसेच विरोधी पक्षनेते राहुल पुरवत यांनी वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत संदर्भातली माहिती न मिळत असल्याने उपोषण करण्याची वेळ येऊनही जर विरोधी पक्षांना माहिती मिळत नाही तर सर्वसामान्यांची काय अवस्था अशी चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.माहिती लपवण्या मागे सत्य काय आहे याचे गुपित कधी उलगडणार याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. करकब ग्रामपंचायतीचे रूपांतर करण्यासाठी विरोधी पक्षासह इतर प्रादेशिक पक्ष, सर्व सामाजिक संघटना यांनी यापूर्वी वेळोवेळी प्रयत्नही केले आहेत. पण करकम ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले नाही. नगरपंचायत झाल्यास करकम चा निश्चितच कायापालट होईल असे सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.
यापूर्वीच अकलूज नातेपुते व इतर ग्रामपंचायत त्यातच नुकत्याच अनगर सह इतर ग्रामपंचायतचे ही नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. करकंब नगरपंचायत करण्यासाठी सत्ताधारी पुढाकार घेतील का? अशी चर्चा सुरू आहे.सत्ताधार्‍यांनी कारभार चालू केल्यापासून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. नगरपंचायत चा विषय असो, माहिती मागवणे, गावातील निकृष्ट दर्जाचे खराब अंतर्गत रस्ते, घाणीचे साम्राज्य, स्वच्छता, आरोग्य, वीज पाणी, केलेल्या कामाची अनियमितता, अनेक मूलभूत व विकासाच्या प्रश्नावरून विरोधी पक्ष नेते राहुल पुरवत, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष धोत्रे, पांडुरंग नगरकर आदीसह सतत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत असतात. पण सत्ताधारी ही विरोधकांना काठावरचे बहुमत का असेना अजिबात जुमानत नाहीत. अशी कुजबूज सध्या ग्रामस्थांमधून चर्चिली जात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदार सत्ताधाऱ्यांना दे धक्का देणार की विरोधकांना कौल देणार हे येणारा आगामी काळच ठरवेल.