*करकंब मध्ये पर्युषण महापर्व उत्साहात संपन्न.* *हाय.. हॅलो छोडो... जय जिनेन्द्र बोलो च्या महिलांच्या जयघोषाने करकंब परिसर दुमदुमला...!*

करकंब/ प्रतिनिधी :
-जैन धर्मामध्ये प्रमुख सन असलेला पर्युषण
महापर्व जैन सवत्सरी अजून हा सण ऋषीपंचमीचे अनंत चतुर्दशी या दहा दिवसांच्या दरम्यान साजरा केला जातो.
यामध्ये भगवंताची पूजा आराचना उपासना मोठ्या भक्ती भावाने केली जाते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री. 1008 बद्रीनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर व श्री 1008 नेमिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर पर्युषण महापर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
या दशलक्षण महाप्रवाहामध्ये आचार्य श्री 108 विद्यासागर मुनी महाराज यांचे विशेष शिष्य बा ब्र विकास भैय्याजी यांच्या सानिज्ञात दहा दिवसांमध्ये संगीत पूजा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी सात वाजेपासून संगीतमय वातावरणामध्ये भगवंताची पूजा अर्चना करण्यात येत होती. सायंकाळी भक्त भगवंताची आरती व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दक्ष लक्षण पर्वसाठी सकल जैन समाज करकंब येथील सर्वांनी सहभाग घेतला. या दशलक्ष महावीराची सांगता भाद्रपद पौर्णिमेस सकाळी भगवंताचा अभिषेक करून पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत णमोकार ढोल पथक व महिला लेझीम पथक हे मुख्य आकर्षक होते. तसेच या ढोल पथक का मध्ये जैन युवक वर्ग व लेझीम पथकामध्ये सर्व महिलांचा सहभाग होता. हे दशलक्ष महापर्व यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दिलीप नाना पुरवत, शरद भई शहा, बाहुबली पुरवत, प्रभाकर वायकसकर, बाळासाहेब पंत ,दिलीप खडके, इंद्रजीत शहा, सुनील पूरवत,
प्रदीप पुरवत, राहुल काका पुरवत, भारत शहा, विकास शहा ,महावीर भाळवणकर ,राजेश शहा, अभिषेक पुरवत,अजिंक्य पूरवत, सिद्धेय पुरवत, डॉक्टर प्रसाद पूरवत, अमित शहा ,डॉक्टर चैतन्य पुरवत, प्रतीम मार्डे, चेतन पूरवत, वैभव पुरवत, मयूर पुरवत,विकास वायकसकर, वरूण पुरवत ,तसेच महिला स्नेहल पुरवत,तृप्ती पुरवत, कल्याणी वायकसकर, सारिका भाळवणकर इत्यादी परिश्रम घेतले .