*अभिजीत पाटील  'सहकाराचा चौथा स्तंभ'* *मुंबई दरबारी मुख्यमंत्रत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला सन्मान*

*अभिजीत पाटील  'सहकाराचा चौथा स्तंभ'*  *मुंबई दरबारी मुख्यमंत्रत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला सन्मान*

पंढरपूर /प्रतिनिधी

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, पंढरपूरचे उद्योजक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, अभिजीत पाटील यांचा 'सहकाराचा चौथा स्तंभ' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.


सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये करण्यात आले. हा कार्यक्रम अप्रतिम मीडियाने आयोजित केला होता. यावेळी राज्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याचवेळी अप्रतिम महावक्ता 2022 23 रिपब्लिक टॅलेंट रियालिटी शो शाश्वत विकासाच्या दिशेनेचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सहकाराचा चौथा स्तंभ पुरस्कार अभिजीत पाटील यांना देण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिजीत पाटील यांचे भरभरून कौतुक केले. साखर कारखाना चालवणे सोपे नसले तरीही, राज्यात अर्धा डझन कारखाने पाटील सध्या चालवत आहेत. साखर कारखान्याच्या माध्यमातून कोरोना काळात त्यांनी राज्यातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे. अभिजीत पाटील यांच्या कारखान्यांची संख्या सहा वरून लवकरच दहावर जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

चौकट

मुंबईतील अप्रतिम मीडियाकडून दिला जाणारा 'सहकाराचा चौथा स्तंभ' हा पुरस्कार विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना प्रदान करण्यात आला. येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सहा जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान पार पडला.