*शेतकऱ्यांसोबत गद्दारी कराल तर वटणीवर आणू..* *स्वाभिमानीचे नेते सचिन पाटील यांचा वीज वितरण अधिकारी यांना अखेरचा इशारा*

पंढरपूर/प्रतींनीधी
आठ दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करू नये शेतातील उभी पिके जाळून विज बिल वसुलीची पद्धत बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा तहसीलदार सुशील बेलेकर साहेबांना दिला होता,
त्यानंतर तहसीलदार साहेबांनी महावितरणचे अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एक समन्वयाची मीटिंग लावली होती त्यामध्ये पाच एचपी ला तीन हजार रुपये आणि त्यापुढील मोटारींना 5000 किंवा एचपी ला पाचशे रुपये भरायचे ठरले होते
परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी तीन तीन हजार रुपये प्रमाणे पैसे गोळा केलेले असतानाही ते वीज बिलाची रक्कम न स्वीकारता आम्हाला एचपी ला हजारच द्या अन्यथा वीज पुरवठा बंदर करू अशाप्रकारे शेतकऱ्यांना भेटीस धरण्यास सुरुवात केला आहे
जर महावितरणचे अधिकारी ठरल्याप्रमाणे वागणार नसतील तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना ही रस्त्यावर उतरेल महावितरण चे खाजगीकरण होऊ नये तसेच राज्यकर्त्यांनी सत्तेच्या बाहेर असताना शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठ्याचा स्वप्न दाखवायचं आणि सत्तेत गेल्यानंतर पाठीमागून वीज वसुलीचे आदेश द्यायचे अशी भूमिका घेऊन फसवल्यामुळे कुठेतरी समन्वयाचा तोडगा काढला होता जर हा तोडगा महावितरणचे अधिकाऱ्यांना मान्य नसेल तर आम्हीही तो कचराकुंडीत फेकून देणार आणि रस्त्यावर उतरणार
जर शेतकरी पैसे द्यायला तयार असून सुद्धा पैसे न स्वीकारतात जाणीवपूर्वक वीजपुरवठा बंद ठेवून शेतकऱ्यांची पिके जाणार असाल तर या एमएसईबीच्या मजूर अधिकाऱ्यांना गावागावात जोडपून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि एकही रुपया न भरता वीज पुरवठा सुरळीत करून घेतला जाईल याची दखल महावितरण व तिथल्या अधिकाऱ्यांनी घ्यावी जर आम्ही रस्त्या उतरला तर परिणाम वेगळे होतील होणाऱ्या परिणामास स्वतः महावितरण जबाबदार असेल असेही सचिन पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.