*करकंब च्या गाव तळ्यात पाणी सोडण्याचा प्रश्न मार्गी लावू* *पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन* *राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरहरी देशमुख यांनी सादर केली माहिती*

*करकंब च्या गाव तळ्यात पाणी सोडण्याचा प्रश्न मार्गी लावू*  *पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन* *राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरहरी देशमुख यांनी सादर केली माहिती*

*करकंब /प्रतिनिधी*

- करकंब येथील शिवकालीन तलावात उजनीचे पाणी सोडणे संदर्भात येथील पदाधिकारी पाठपुरावा करत आहेत याबाबत कार्यवाही करून तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी चे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मिळावे व जनसंवाद निमित्त सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना करकंब येथे धावती भेट दिली यावेळी पाटबंधारे मंत्री जयंत पाटील बोलत होते पाटील यांचे स्वागत राष्ट्रवादी जिल्हा संघटक नरसप्पा देशमुख यांनी केले.
येथील शिवकालीन तलावात उजनीचे पाणी सोडले तर करकम च्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार आहे यादृष्टीने येथील पदाधिकारी सतत पाणी सोडावे .यासाठी आमदार बबन दादा शिंदे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील यांच्या भेटी घेऊन याबाबतचे प्रश्न मांडले जात आहेत याबाबत शरद पवार जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखवला असून कार्यवाहीचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की शिवकालीन तलाव पाणी सोडणे हा करकंब मधील नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे याबाबत आपण सोलापूर येथे संबंधित विभागाची बैठक घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे,सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अड गणेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख,उपसरपंच आदिनाथ देशमुख,प्रा सतीश देशमुख,सरपंच प्रतिनिधी अड शरदचंद्र पांढरे,ग्राम पंचायत सदस्य महादेव व्यवहारे,तुकाराम माने,राहुल शिंगटे, बलभीम पाटील,कान्हापुरीचे सरपंच प्रेम चव्हाण,सुधीर मुगदुम आदी उपस्थित होते.