*मोहोळ मतदार संघात पंढरपूर पॅटर्न सुरू!* *मकर संक्रांती दिनानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम* *राजाभाऊ खरे यांच्या पत्नी तृप्तीताई खरे यांचाही कार्यक्रमाच्या निमित्ताने गावदौरे सुरू*

*मोहोळ मतदार संघात पंढरपूर पॅटर्न सुरू!*   *मकर संक्रांती दिनानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम*   *राजाभाऊ खरे यांच्या पत्नी तृप्तीताई खरे यांचाही कार्यक्रमाच्या निमित्ताने गावदौरे सुरू*

पंढरपूर/प्रतिनीधी

२४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे  यांच्या पत्नी सौ. तृप्तीताई राजु खरे यांच्या उपस्थितीत मकर संक्रांतीनिमित्त मोहोळ मतदार संघातील विविध गावात हळदी कुंकू कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील पॅटर्न आता मोहोळ मतदार संघातही सुरू करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत. यामुळे या मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघातून उमेदवार म्हणून इच्छुक असलेले उद्योजक राजाभाऊ खरे यांनीही आपला संपर्क वाढविण्यास मोठा जोर धरला आहे. विविध कार्यक्रमाचे निमित्ताने खरे गावोगावी भेटी आणि मदतकार्य सुरूच आहे. अशातच मागील काही दिवसांपासून त्यांच्या पत्नी तृप्तिताई खरे आणि लहान बंधू विजय खरे यांनीही आपले गवभेटीसाठी दौरे वाढविले आहेत. यामुळे खरे यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे.
मागील दोन दिवसांपासून हळदी कुंकू कार्यक्रम सुरू केले आहेत.यामधे मोहोळ मतदार संघातील असलेल्या तारापूर येथे महिलाच्या वतीने तृप्तीताई यांचा सत्कार करण्यात आला . ग्रामस्थच्या वतीने विजय खरे यांचाही सत्कार गोरख वाघमोडे (ग्रा सदस्य) व सिद्धेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
      हळदी-कुंकू सारख्या समारंभामध्ये महिलांमध्ये  एकत्र येणे हे महत्त्वाचं आहे हळदी कुंकू समारंभाची परंपरा केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतभर आहे सामाजिक उद्देशाने एखादी परंपरा पुढे नेणे हा आपला सांस्कृतिक सण वारसा आहे तो पण जपायला हवा.
गावातील महिला ग्रामस्थ
रंगुबाई वाघमोडे (माजी सरपंच), राणी कोळी (माजी सरपंच) ,वैष्णवी डोळे (ग्रा सदस्य) ,भामाबाई सपाटे (ग्रा सदस्य), अर्चना शिंदे (ग्रा सदस्य), रेखा शिंदे (बचत गट अध्यक्ष) ,सविता निर्मळ (बचत गट अध्यक्ष), सुनिता चव्हाण (बचत गट अध्यक्ष), कांचन नळे, .स्वाती भोई (बचत गट अध्यक्ष) ,शुभांगी कुलकर्णी ( बचत गट अध्यक्ष) ,समीरा तांबोळे (बचत गट अध्यक्ष), दिपाली मिसाळ (बचत गट अध्यक्ष). आदी महिलांसह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.