*करकंब मध्ये भरणार आज वैष्णवांचा मेळावा....!*

करकंब /प्रतिनिधी :-
करकंब मध्ये आज सात पालख्यांसह लाखों भाविक असणार मुक्कामी
-भाविकांच्या सोईसुविधासाठी करकंब ग्रामपंचायतला 10 लाख रु.चा निधी
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी केली तयारीची पाहणी
करकंब ता. पंढरपूर येथे बुधवारी दि 6 रोजी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज, श्रीसंतएकनाथ महाराज,श्रीसंत निळोबाराय,संत मुक्ताबाई,कैकाडी महाराज,शनी महाराज,जनार्धन महाराज,किसनगिरी महाराज या पालख्यांसाह लाखों भाविक वारकरी,लहान-मोठ्या दिंड्या एकाच दिवशी मुक्कामी येत असून त्यांच्या सोई सुविधांसाठी करकंब ग्रामपंचायतिला प्रशासनाकडून 10 लाख रु.चा निधी देण्यात आला आहे.
रविवारी जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, शिक्षणविस्तार अधिकारी मारुती लिगाडे यांनी पालखी तळांची व वारकऱ्यांच्या व्यवस्थेची पाहणी केली.
नगर,नाशिक, देवगड,पैठण यासह विदर्भातून आलेले लाखो भाविक हे अष्टमीला करकंब मध्ये मुक्कामी असतात.वाड्यावस्त्यांवर अनेक ठिकाणी लहान-मोठ्या दिंड्या मुक्कामी असतात.
श्रीसंत एकनाथ महाराजांची पालखी मुक्कामी असणाऱ्या नरसिंह मंदिराच्या सभामंडपाची पडझड झाल्याने तो पूर्ण पाडून त्याठिकाणी तात्पुरता प्रशासनाकडून पत्राशेड उभारण्यात आला आहे.
चौकट :-
आज मंगळवार दि 5 रोजी संत निळोबाराय पालखीचे करकंब येथील जळोली चौक येथे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी तथा पालक प्रतिनिधी लिगाडे साहेब,तालुका कृषी अधिकारी महेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रभावती साखरे,अँड.शरदचंद्र पांढरे, वाहतूक शाखेचे विजय गोरवे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.या पालखी मध्ये 10-12 हजार भाविकांचा समावेश आहे.त्यामुळे आता करकंब मध्ये भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
चौकट :-
- आरोग्य सेवेसाठी पथक तैनात
जळोली चौक व संत निळोबाराय पालखी मुक्कामी असलेल्या सिद्धनाथ मंदिर येथे वैद्यकीय अधिकारी प्रभावती साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले आहे.यामुळे भाविकांना वैद्यकीय सेवा जलद उपलब्ध होत असून याठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी अँबुलन्स गाडी ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.या पथकामध्ये एक मेडिकल ऑफिसर सह 10 ते 15 कर्मचारी काम पाहत आहेत.तसेच ग्रामीण रुग्णालयात ही भाविकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चौकट :-
- पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त
करकंब मध्ये आज दि 6 रोजी लाखो भाविक मुक्कामी आसल्याने भुरट्या चोऱ्या होऊ नयेत यासाठी करकंब पोलीस सतर्क असणार आहेत.टेंभुर्णी - पंढरपूर मार्गावर भोसे पाटी येथे नाका बंदी लावण्यात आली आहे.वारीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनासोबत पोलीस पाटील व पोलीस मित्र ही गावात गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या वेशात कार्यरत असणार आहेत.
चौकट
- करकंब ग्रामपंचायत पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज
करकंब गावात आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला वारीचे स्वरूप येत असते.अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर भाविक मुक्कामी असतात.त्यामुळे सर्वत्र दिवा बत्तीची सोय,काटेरी झाडे झुडपे काढून रस्त्याच्या बाजूला साफसफाई केली असून पालखी तळावर स्वच्छता ठेवण्यात आली आहे.पिण्याच्या पाण्याची सोय पाणीपुरवठा टँक वर करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी दिली आहे.त्यामुळे गावात प्रवेशद्वारांवर ग्रामपंचायतच्या वतीने भाविक भक्तांच्या स्वागतासाठीच्या कमानी लावण्यात आल्या असून स्वागतासाठी ग्रामपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे.
चौकट :-
- विजवीतरण कंपनीने किरकोळ पूर्ण कामे
वारीच्या पार्श्वभूमीवर करकंब वीज वितरण कंपनीकडून अनेक ठिकाणची धोकादायक तारेवरील झाडे झुडपे तोडून किरकोळ सर्व कामे पूर्ण केली असून उद्यापासून 5 ते 6 दिवस कोणत्याही प्रकारचे लोड शेडिंग नसल्याचे सांगण्यात आले आहे.वारीदरम्यान यामुळे वारकऱ्यांना अंधाराला सामना करावा लागणार नाही तसेच आपले मोबाईल चार्जिंग करण्यास व इतर इलेक्ट्रिक वस्तू साठी वीज उपलब्ध होणार आहे.
चौकट :-
करकंब मध्ये विविध संतांच्या लहान मोठ्या पालख्यांचा तसेच दिंड्यांचा मुक्काम असतो. त्या अनुषंगाने येथील रामभाऊ जोशी हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व तयारी केली आहे.
मंगळवार दिनांक 4 रोजी करकंब येथे श्री संत निळोबा राय महाराज पारनेर यांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रशासकीय स्वागत करताना गटविकास अधिकारी तथा पालक प्रतिनिधी लिगाडे साहेब, तालुका कृषी अधिकारी महेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रभावती साखरे, एडवोकेट शरदचंद्र पांढरे, पोलीस वाहतूक शाखेचे विजय गोरवे, अदि सह वारकरी भाविक भक्त व ग्रामस्थ भावित भक्त व ग्रामस्थ .