*करकंब ,उंबरे (पागे) करोळे रस्त्यावर झाडा झुडपांचे अतिक्रमण*

करकम्ब :-प्रतिनिधी
करकंब उंबरे (पागे), करोळे रस्त्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या परिसरातून उजनीचा कॅनाल गेला असल्याने ठिकठिकाणी वळणे आहेत. तसेच या परिसरामध्ये उसाचे बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने साखर कारखान्याकडे ऊसाची वाहतूक करणारी ट्रॅक्टर सारखी जड वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते .रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या काही ठिकाणी रस्त्यांवरती आलेल्या आहेत त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते .करकंब ,जळोली ,उंबरे (पागे) करोळे येथील नागरिक अकलूज येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात .परंतु ठीक ठिकाणी रस्त्यांवर झालेले झाडाझुडपांचे अतिक्रमण ,धोकादायक वळणे ,यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या काढून रस्ता सुरळीत करावा .तसेच रस्त्याच्या कडेच्या साईड पट्ट्या भरून घ्याव्यात ,अशा प्रकारची मागणी या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.