*करकंब येथील सोमवार पेठ येथे कै.सौ. कांचन विठ्ठल शिंगटे यांच्या स्मरणार्थ CCTV लोकार्पण सोहळा.* *शिंगटे ग्रामपंचायत सदस्य , सोमवार पेठ नागरिकांच्या प्रतिसादातून सोमवार पेठेचे झाले सिंगापूर .......!* *माझा वार्ड- माझी जबाबदारी या संकल्पनेतून ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या सहकार्यातून राज्यात केला वेगळा निर्माण पॅटर्न.*

*करकंब येथील सोमवार पेठ येथे कै.सौ. कांचन विठ्ठल शिंगटे यांच्या स्मरणार्थ CCTV लोकार्पण सोहळा.*  *शिंगटे ग्रामपंचायत सदस्य , सोमवार पेठ नागरिकांच्या प्रतिसादातून सोमवार पेठेचे झाले सिंगापूर .......!*  *माझा वार्ड- माझी जबाबदारी या संकल्पनेतून ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या सहकार्यातून राज्यात केला वेगळा निर्माण पॅटर्न.*

करकंब /प्रतिनिधी

:-करकंब पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव व सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली राजकीय राजधानी म्हणून ओळख आहे. या करकंब नगरीत अगदी एसटी स्टँड पासून ते धाकटी वेशीपर्यंत... म्हसोबा चौक ते शुक्रवार पेठ -महादेव मंदिर-धाकटी वेस -बाजारपेठ (टिळक चौक )-रोहिदास नगर-शुक्रवार पेठ-न्यू इंग्लिश स्कूल या अंतर्गत रस्त्यांची तसेच अशा अनेक असलेल्या रस्त्यांची अवस्था अतिशय खडतर आणि निकृष्ट असल्याने या रस्त्यावरून चालताना सामान्य नागरिकांना वाहन धारकांना विशेषता अबालवृद्ध व महिलावर्ग बालगोपाळांना याचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. याचे सोयरसूतक ना ग्रामपंचायत ला आहे ना ग्रामविकास अधिकाऱ्याला आहे. दरवेळी दर वर्षी त्याच्.. त्या रस्त्याची ठेकेदारी... ठेकेदारी तुन टक्केवारी.... ठेकेदारी तून पैसा ....पैशातून सत्ता...
.सत्तेतून पुन्हा ठेकेदारी ....अशी संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याने या रस्त्यांची अशीच विल्हेवाट वर्षं न वर्षे सुरूच राहणार असे या भागातील नागरिकातून बोलले जाते. विरोधक मूग गिळून गप्प बसलेत ..तर नागरिक मात्र झोपेचे सोंग घेऊन त्याच त्या खडतर रस्त्यावरून चालत पांघरूण घालत आहेत .पण याउलट करकंब येथीलच सोमवार पेठ येथील माजी उपसरपंच बाळासाहेब शिंगटे, तसेच राहुल शिंगटे,  विवेक शिंगटे या ग्रामपंचायत सदस्य असलेल्या बंधूंनी व सोमवार पेठेतील सर्व नागरिक, आबालवृद्ध, महिला, व युवक वर्गांनी एकमेकांच्या प्रतिसादातून सहकार्यातून लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांच्या निधीतून मिळालेल्या श्रीराम मंदिर ते स्टेट बँक (सोमवार पेठ) हा रस्ता अतिशय उत्कृष्टपणे व गुणात्मक दर्जा चा रस्ता करून करकंब सह पंचक्रोशीत नव्हे तर या रस्त्याचा आगळा-वेगळा पॅटर्न तयार करून राज्यात आदर्श निर्माण  केला आहे. सोमवार पेठ येथे गेल्यानंतर आणि  हा रस्ता पाहिल्यानंतर सोमवार पेठ नव्हे तर सिंगापूर येथे आल्याचा भास अनेक जण व्यक्त करीत आहेत.
त्याच धर्तीवर आता या ग्रामपंचायत सदस्य असलेल्या शिंगटे बंधूंनी कै.सौ.कांचन विठ्ठल शिंगटे यांच्या स्मरणार्थ  C C T V लोकार्पण सोहळा... वार्ड क्रमांक सहा येथे असलेल्या सोमवार पेठ येथे आज सायंकाळी सहा वाजता स्मार्ट सोमवार पेठ या संकल्पनेच्या दिशेने येथील नागरिकांच्या व परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकून करकंब नव्हे तर जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.