*चळे येथे  राज्याचे नेते दिलीपबापू  धोत्रे यांच्या हस्ते मनसे शाखचेउदघाटन*

*चळे येथे  राज्याचे नेते दिलीपबापू  धोत्रे यांच्या हस्ते मनसे शाखचेउदघाटन*

पंढरपूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षीय पातळीवर आपल्या भागातील दिलीपबापू धोत्रे यांना अतिशय महत्वाचे स्थान मिळाले आहे. 
  मनसेनकडून सध्या पक्ष वाढविण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत, अशातच दिलीपबापू धोत्रे यांनी राज्यभरातील दौऱ्याबरोबरच आपले होम ग्राउंड असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील  कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष मजबूत करण्यासाठी आपले लक्ष केंद्रित केले आहे.
याचाच एक भाग म्हणून
   चळे तालुका पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला.
 तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, उपजिल्हा अध्यक्ष महेंद्र पवार, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, उपतालुका अध्यक्ष बालाजी गोवे, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, शाखा अध्यक्ष खंडू बंडगर,उप शाखा अध्यक्ष आनंद मोरे, तेजस गांजले, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष अजय मोरे,, शुभम काकडे इत्यादी उपस्थित होते,,