*वीज महावितरण कार्यालय चळे येथे २५१झाडाचे वृक्षारोपण*

पंढरपूर/प्रतिनीधी
आषाढी वारीच्या शुभदिनी आणि महावितरण पंढरपुर ग्रामिण १ चे उपकार्यकारी अभियंता प्रकाश पाटील व सहाय्यक अभियंता प्रशांत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपनाचा कार्यक्रम महावितरण कार्यालय चळे येथे घेण्यात आला.
यावेळी २५१ रोपांची लागवड करण्यात आली. यामध्येआंबा,पिंपळ,चिंच
उंबर, बेल आदी प्रकारची झाडे लावण्यात आली . याप्रसंगी चळे गावचे सरपंच माउली शिखरे, ग्राम पंचायत सदस्य युवराज गायकवाड ,आंबे गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय ताड ,.कल्याणराव कांबळे , अमोल गवळी , संतोष कोळी, पंकज सुतार, महेश घायाळ, माउली घाडगे,विजय करावे, माने गुरुजी , प्रताप गायकवाड तसेच चळे येथील वृक्षमित्र राजेंद्र गाेवे उपस्थित होते.