*रस्त्यालगत सुरु असलेले विटभट्टीचा प्रवाशाना भलताच होतोय त्रास* *रस्त्यावरून जात असताना भुसा, राख, आणि मातीमुळे डोळ्यांना पोहचत आहेत इजा* *पंढरपूर महसूल प्रशासनाचे जाणूनबुजून डोळेझाक काम*

पंढरपूर/प्रतिनीधी
पंढरपूर तालुक्यातील महसूल प्रशासन किती सतर्क आहे. हे पंढरपूर शहराकडे येणाऱ्या विविध रस्त्यालगतच सुरू असलेल्या बेकायदेशीर वितभट्टीमुळे लक्षात आले आहे. या कुचकामी स्थानिक महसूल कर्मचारी यांच्या कामामुळे रस्त्यावरून जाताना डोळ्यात भुसा, राख, आणि मातीमुळे डोळ्यांना इजा पोहचत आहेत. यामुळे याच रस्त्यावरून जाणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांनीही डोळ्याने पाहूनही स्थानिक महसूल विभागाला याबाबत कारवाईचे आदेश दिले गेले नाहीत. यामुळे स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी यांनाही या बेकायदेशीर विटभट्टी चालविण्यासाठी पाठिंबाच असल्याचे दिसून येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील जवळपास सर्वच रस्ता कडेला अगदी लगतच अनेक वीटभट्टी मागील अनेक वर्षंपासून सुरू आहेत. या वीटभट्टीसाठी
लागणारी माती उचलण्याची परवानगी घेताना ती भट्टी नेमकी कुठल्या ठिकाणी आहे. त्याचा नागरिकांना त्रास होतो का?. याची खातरजमा केल्यानंतर माती उचलण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. त्यातच तालुक्यात सुरू असलेल्या वीटभट्टी पैकी किती वीटभट्टी या कायदेशीर सुरू आहेत. माती उचलण्याची परवानगी आणि केलेला साठपा, त्यामधून निघालेले विटाचे उत्पन्न याबाबत महसूल विभागाकडून कधीही खातरजमा करून बेकायदेशीर विटभट्टी चालकावर कारवाई करून कोणत्याही प्रकारचा आर्थिक दंड वसूल केल्याचे निदर्शनास आणून दिल्याचे दिसून आले नाही.
ज्या भागांत वीटभट्टी आहे, त्या भागातील स्थानिक महसूल विभाग यांनी यापुढील काळात तरी वीटभट्टीचा अहवाल वरीष्ठ अधिकारी यांना देण्यात यावा अशी मागणी काही समाजसेवक यांच्या कडून येऊ लागली आहे.
मागील काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यकाळात रस्त्या कडेला लगत असलेल्या विट भट्टी बंद करण्याच्या सूचना देताच यावरती स्थानिक महसूल कर्मचारी यांनी दखल घेत त्यावेळी बंद करून दाखविल्या होत्या. त्यामुळे रस्त्याकडेला असलेल्या वीटभट्टीचा रस्त्यावरून चालत आणि दुचाकीस्वाराला होणारा त्रास थांबवावा त्यामुळे डोळ्यांना होणारा धोका टाळावा अशी मागणी होत आहे.