*पंढरीत सोमवारी लहुजी शक्ती सेनेचा संघटना विस्तार* *तालुक्यातील नव्याने होणार नवीन पदाधिकारी निवडी*

*पंढरीत सोमवारी लहुजी शक्ती सेनेचा संघटना विस्तार*  *तालुक्यातील नव्याने होणार नवीन पदाधिकारी निवडी*

पंढरपूर, /प्रतिनिधी


पंढरीत ,सोमवारी दि 23 जानेवारी रोजी लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी निवडीचे आयोजन करण्यात आले आहे.यासंधर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देविदास कसबे यांनी दिली आहे.   
                          पंढरपूर दिनांक लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेच्या पंढरपूर , तालुक्यांमधील नवीन  पदाधिकार्‍यांच्या निवडी व संघटना विस्ताराच्या दृष्टीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष - माननीय विष्णू भाऊ कसबे हे पंढरपूरच्या पावन नगरी मध्ये उपस्थित राहणार आहेत. सदरची बैठक -शेठ जाधवजी धर्मशाळा स्टेशन रोड पंढरपूर येथे दुपारी बारा वाजता होणार आहे.
 या बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी कैलास खंदारे, सचिन क्षीरसागर, महादेव भोसले हे संघटनेचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तरी पंढरपूर तालुक्यातील या संघटनेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी  उपस्थित रहावे असे असे  आवाहन अशोक पाटोळे , देविदास कसबे,  मुकुंद घाडगे , जयसिंग मस्के,  प्रदीप रणदिवे यांनी केलेले आहे.