*स्वच्छता व पर्यावरणासाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांना करकंबच्या नागरिकांनी साथ द्यावी-भास्कर पेरे पाटील.*

करकंब/ प्रतिनिधी
:-२५ वर्षे पाटोदा ग्रामपंचायतचे सरपंचपद भूषविलेल्या भास्कर पेरे पाटील यांनी पाटोदा गावामध्ये पाण्याची व्यवस्था नसताना बंधारे बांधून कायमस्वरूपी पाण्याची कशाप्रकारे सोय केली,पाटोदा गावामध्ये करण्यात आलेल्या नागरी सुविधा,स्वच्छता व पर्यावरणासाठी कशाप्रकारे नियोजन केले,समाजाची माऊली म्हणून काम करत राहिल्यास कोणतेच प्रश्न निर्माण होत नाहीत, गावांमध्ये स्वच्छता व पर्यावरण व्यवस्थित असेल तर आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होणार नाहीत, वडीलधारी व्यक्तींचा मान सन्मान ठेवला पाहिजे अश्या प्रकारचे मनोगत व्यक्त केले.
करकंब मध्ये युवक वर्गांकडून स्वच्छता अभियान व वृक्षारोपण याबाबत जो उपक्रम राबवला जात आहे त्यामध्ये करकंब येथील नागरिक, विद्यार्थी,विद्यार्थीनी व्यापारी, पदाधिकारी,ग्रामस्थ यांनी तन,मंन,धनाने सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
यावेळी माऊली दूधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व युवक युवतींचे कौतुक करून यापुढेही समाजसेवेचे हे कार्य अखंडित चालू ठेवण्याचे आवाहन केले.
करकंब तालुका पंढरपूर येथे मागील वर्षभरापासून पर्यावरण व स्वच्छतेसाठी या क्षेत्रामध्ये काम करणारे जागर स्वच्छता अभियान टीम व करकंब गावच्या लेकीचे झाड अभियान टीमच्या वर्षपूर्ती दिनाच्या निमित्ताने भास्कर पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भास्कर पेरे पाटील यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. करकंब गावचे सुपुत्र सुधीर रणे यांनी एस.टी.प्रवासामध्ये संबंधित चालकास चालू बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखुन एस.टी. बसचा ताबा घेऊन होणारा मोठा अपघात टाळल्याने संबंधित बसमधील ३५ते४०जणांच्या जीविताला होणारा धोका टाळला याबद्द्ल त्यांचा,तसेच करकंब गावच्या लेकीचे झाड अभियान टीमला पुणे येथील श्री.विठ्ठल टायर कार्पोरेशनचे महावीर गायकवाड यांचे आजोबा कै. कुंडलिक कापसे यांचे स्मरणार्थ दिलेल्या ५००० लिटर पाण्याच्या टँकरचा लोकार्पण सोहळा व संबंधित व्यक्ती,जागर स्वच्छता अभियान टीम,करकंब गावच्या लेकीचं झाड या अभियानाचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे व त्यांच्या पत्नी देवकी दुधाणे,तसेच करकंब येथील आपली घरे व दुकानांचा परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या नागरिकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी विद्यार्थी,विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.