*करकंब ची महावीर स्पेशल बाजार आमटी झाली जगप्रसिद्ध आयकॉन*. * बाजरी आणि ज्वारी च्या भाकरी... करकंब च्या बाजार आमटी ची चव लय न्यारी....!*

 *करकंब ची महावीर स्पेशल बाजार आमटी झाली जगप्रसिद्ध आयकॉन*. * बाजरी आणि ज्वारी च्या भाकरी... करकंब च्या बाजार आमटी ची चव लय न्यारी....!*

करकंब /प्रतिनिधी

: ₹करकंब हे नियोजित राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्यामुळे या गावाच्या लगतच पंढरपूर - टेंभुर्णी रोडवरून मोठ्या प्रमाणात परराज्यातून वाहतूक होत असते. त्यातच या राष्ट्रीय महामार्गालगत काही अंतरावर महावीर हॉटेल असल्याने या ठिकाणी परराज्यातून जाणारे- येणारे वाहतूक करणारे,प्रवासी , मोठ्या प्रमाणात असल्याने या हॉटेल मध्ये आल्यानंतर बाजार आमटी खाऊन विशेषता बरोबर पार्सल  घेऊन जातात. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले विदेशी भाविक, पर्यटक आवर्जून विशेषता बाजार आमटीची चव चाखण्यासाठी व बाजार आमटी घेऊन जाण्यासाठी येतात.

 बाजार आमटी सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण बाज म्हणून चटक - मटक ' करकंबची बाजार आमटी ' या प्रकारची चव नाही चाखली तर कदाचित सोलापूरी चव विश्वातले अधोरेपण होऊ शकते . इतकी बाजार आमटी झपाट्याने महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. या बाजार आमटी रस्सा आमटीची एक पारंपारीक जन्मकथा आहे . कांही शतकापूर्वी आपला माल घोड्यावर लादून महिनोमहिने करकंब ता . पंढरपूर या मध्यवर्ती गावात मुक्कम ठोकत असत . या व्यापाऱ्यांनी केवळ भाकरी येत असे . कांही शतकापूर्वी आपला माल घोड्यावर लादून महिनोमहिने बाजार साठी परगावी जात असत या व्यापाऱ्यांनी केवळ भाकरी बडवता येत असे . रात्रीच्या भोजनाला भाजी करायचे फार कष्ट न घेता हे व्यापारी बाजार आमटी बनवत असत . सर्दी , पडसे , ताप , थंडी अशा हंगामी रोगावर एक जालीम उपाय म्हणून ही आमटी अर्धा पाऊण लिटर प्यायलाही हे व्यापारी कमी करत नसत . अत्यंत चवदार तिखटपणा न बाधणारी ड्री आमटी यातील पारंपारीक बाज जपून व बॉईलिंग टायमिंगचे व इतर मिश्रण पद्धत अधिक चवदार करण्याचे संशोधनात्मक तंत्रशुध्द गणित आखून नव्या ढंगात गेले बारा वर्ष सोलापूर जिल्ह्याच्या हॉटेल उद्योगात नाव कमवले . या बद्दलचे श्रेय करकंबचे तरुण उद्योजक संतोष पिपळे व राहुल पुरवत या दोघांकडे जाते . ही आमटी एकदा का चाखली की अस्सल खव्वर पुन्हा पुन्हा या आमटीच्या प्रेमात पडतात . मोठ्या सोहळ्यातही ' जरा हटके मेनू ' म्हणून अलीकडे या आमटीने टेबलावर मानाचे स्थान मिळविण्यास प्रारंभ केला आहे . अशा सोहळ्यासाठी ही आमटी तेथे जाऊ बनवून देण्याची सेवाही पिंपळे - पुरवत ही तरुण जोडगोळी करुन देत आहेत . गरम भाकरी , बाजार आमटी व तोंडी लावायला खारे शेंगदाणे हा मेनू सोलापूर जिल्ह्याचा मदमस्त मेनू आहे . हा एकदा तरी चाखायलाच हवा . करकंब चे तरुण युवा उद्योजक संतोष पिंपळे व राहुल पूरवत या जोडगोळीने करकंब चीही बाजार आमटी या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातच नव्हे परदेशातील लोकांनाही भुरळ पाडली. आणि करकंब ची बाजार आमटी अगदी सातासमुद्रापलिकडे जाऊन पोहोचली. हॉटेल व्यवसायातील युवा उद्योजक राहुल पूरवत यांनी आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून एक वेगळे स्थान निर्माण केले. करकंब सारख्या ग्रामीण भागाचे नाव काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत महावीर स्पेशल बाजार आमटी हे नाव आता जगप्रसिद्ध आयकॉन बनले आहे.