*माझ्या राजकारणाचा भार विठ्ठलवर पडणार नाही* *चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिले सर्वच निवडणुका लढविण्याच संकेत*

पंढरपूर/प्रतिनिधी
श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 25 हजार 392 सभासदांच्या मालकीचा विठ्ठल परिवार आहे. यासाठी मला नेतृत्व करण्याची संधी बहुमताने सभासदांनी दिली आहे. यामुळे या परिवाराचे नेतृत्व करीत असतांना कोणतेही राजकारण न पाहता दुजाभाव केला जाणार नाही. उलट सर्वांना सोबत घेवून पंढरपूर तालुक्यातील सर्व निवडणुका विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. यासाठी लागणार्या खर्चाचा कसलाही बोजा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पडणार नाही. अशी ग्वाही नूतन चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
कारखाना कार्यस्थळावर चेअरमन आणि व्हा.चेअरमन निवडी नंतर आयोजीत करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण निवडणुक काळामध्ये प्रचार सभेच्या माध्यमातून जी आश्वासने दिली आहेत. ती पुर्ण करून दाखविणार असून आज कारखान्याचे केलेले रोलर पुजन हेच खरे कारखाना सुरू करणार असल्याचे सिध्द झाले आहे.
आपण यापुर्वीही कारखान्याच्या भत्ता, गाडी, डिझेल अथवा इतर कोणताही खर्च करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे आपण काट कसरीने कारखाना चालवून सभासद आणि कामगार यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने वाहनांचे करार पुर्ण झाले आहेत. आपल्यावर निवडणुकीत ज्या विश्वास दाखवला त्याच प्रमाणे कारखाना चालवून शेतकर्यांच्या ऊसाचे बिलही खात्ररीने देणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत सभासदांनी मोठ्या संख्येने ऊसाच्या नोंदी कारखान्याकडे देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे त्यांनी दाखविलेल्या विश्वासास तडा जावू न देता पहिल्याच गळीत हंगामात 2500 शे रूपयांचा भाव देवून दाखविणारच असल्याचे सांगत मंगळवेढ्यातील दामाजीच्या निवडणुकीत त्यांनी आघाडी केली. त्यांनीही एवढे बिल देवून दाखवावे असा टोला ही विरोधकांना लगावला आहे. कामगारांनी संस्थेशी प्रामाणीक राहून काम करावे. संस्थेच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी नियमांचे पालन करावे असा मोलाचा सल्लाही सभासदबंधुच्या उपस्थितीत कामगारांना दिला आहे. चेअरमन पदाची निवड झाल्यामुळे अनेकांना मी सत्कारासाठी गावाकडे यावे असे वाटत आहे. परंतु निवडणुक दिलेले शेतकरी व वाहतूक ठेकेदारांची बिले दिल्याशीवाय सत्कार स्विकारण्यासाठी वेळ देणार नाही. त्यासाठी कोणीही नाराज होवू नये असे सांगत विठ्ठलकडील येणे बाकी असलेल्या लोकांवर कारवाई करून वसुल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तर विठ्ठल सुतगिरणीच्या भाग भाडवल आणि विठ्ठल हॉस्पिटल बाबतही संचालक मंडळ निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या सभेवेळी ह.भ.प.हंडे महाराज यांचे आशिर्वादपर भाषण झाले. यामध्ये त्यांनी विठ्ठलचा चेअरमन हा पंढरपूरचा आमदार होत असतो ही परंपरा आहे. असे अशिर्वादही दिला. यावेळी माजी.नगराध्यक्ष सुभाष भोसले, प्रा.सुभाष मस्के, स्वाभिमानीचे सचिन पाटील, रयतक्रांतीचे दिपक भोसले, माजी संचालक नामदेव ताड, वसंत घाडगे यांच्यासह अनेकांनी भाषणे केली.
चौकट
---
सभासद अन् कामगारांबरोबर पत्रकारांनाही देणार साखर
---------
विठ्ठलच्या वतीने 50 किलो साखर देण्यात येत होती. त्यामध्ये वाढ करून 60 किलो साखर केली आहे. ती साखर वर्षभरातून कधीही घेवून जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नवीन पायंडा पाडत सभासद, कामगार यांच्या बरोबरच आता कारखान्याचे हितचिंतक असलेल्या पत्रकार बंधुनांही साखर मिळण्यासाठी कार्ड देणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी जाहिर केले.
चौकट
--
आबासाहेबांचे नेतृत्व चेअरमन पदापुरते नको - डॉ रोंगेसर
-----
विठ्ठलच्या सभासदांनी आबाहेब यांना विठ्ठलचे चेअरमनपद बहाल केले आहे. परंतु त्या नेतृत्वामध्ये सर्व गुण आहेत. त्यामुळे अभिजीत पाटील यांना केवळ विठ्ठलच्या चेअरमन पदा पुरते न ठेवता अवघ्या पंढरपूर शहर आणि तालुक्यातील जनतेच्या सेवेची संधी मिळावी यासाठी विठ्ठल परिवार प्रयत्नशील असेल असे वक्तव्य नुतन व्हा.चेअरमन सौ.प्रेमलता रोंगे यांचे पती डॉ.बी.पी.रोंगे सर यांनी केले आहे