*करकंब येथे विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाने राष्ट्र संत गाडगे बाबाची जयंती साजरी.*
.*करकंब /प्रतिनिधी.
राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त करकंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक हायस्कूल, ग्रामपंचायत कार्यालय व शासकीय कार्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
करकंब ग्रामपंचायत कार्यालयालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन- भगीरथ दादा भालके यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ग्रामविकास अधिकारी -डॉ. सतीश चव्हाण, मा. ग्रामपंचायत सदस्य ,एड. शरदचंद्र पांढरे, युवा नेते -अभिषेक पुरवत ,अविनाश जाधव, मा ग्रामपंचायत सदस्य- सचिन शिंदे , सुरेश देशमुख आदी सह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती निमित्त करकंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामभाऊ जोशी हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, आदर्श प्रशाला ज्युनिअर कॉलेज, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, आदी विविध ठिकाणी गाडगेबाबा महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.