*आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधात 'काका - बापू ' चमत्कार घडविण्याच्या तयारीत*     *पत्रकार दिन साप्ताह समारोपाच्या वेळी दिसून आलेले दृश्य....*

*आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधात 'काका - बापू ' चमत्कार घडविण्याच्या तयारीत*      *पत्रकार दिन साप्ताह समारोपाच्या वेळी दिसून आलेले दृश्य....*

पंढरपूर /प्रतिनिधी

पत्रकार दिन साप्ताह समारोप पंढरपूर येथील मनसे चे दिलीप बापू धोत्रे तसेच माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले, समाधान काळे, शेखर भालके , भालके गटाचे काही नगरसेवक या सर्व राजकीय पक्षाच्या पंढरपूर येथील नेतेमंडळींनी पत्रकार दिनाच्या निमित्ताने स्थानिक पत्रकारांचा सत्कार व गौरव करण्याच्या उद्देशाने आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
       या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने पंढरपूर शहर व तालुक्यातील मान्यवर पत्रकार ज्येष्ठ पत्रकार तसेच नवोदित पत्रकार या सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, सिद्धार्थ ढवळे सर तसेच अन्य ज्येष्ठ पत्रकार हे उपस्थित होते. या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमा च्या दरम्यान सर्व पत्रकारांना हे दिसून येत होते, की येणाऱ्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना प्रबळ असा विरोधक आता तयार झाल्याचे दिसून येत होते .येणाऱ्या् नगरपालिका निवडणुकीमध्ये हा काका बापूंचा गट तसेच त्यांना सहकार्य करणारा अन्य विरोधी गट हा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये प्रस्थापितां च्या अस्तित्वाला सुरंग लावणार की काय ?असे चित्र आज रोजी दिसून येत होते.
     मनसेचे दिलीप बापू धोत्रे हे आपल्या संघटनेच्या माध्यमातून तसेच समाजकार्याच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील जनतेला सहकार्य करीत आलेली आहे .तसेच कोरोणा रोगाच्या प्रादुर्भाव काळामध्ये गोरगरीब जनतेला अन्नधान्य तसेच औषधे हे मोफत वाटून मदतीचा हात गोरगरिबांना दिलेला आहे. बचत गटाच्या महिलांना आधार दिलेला आहे. बचत गटाच्या महिलांच्या पाठीशी बापू उभे राहिले आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये दिलीप बापू धोत्रे यांना मानणारा एक स्वतंत्र वर्ग तयार झाल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. बापूंची संघटन कौशल्य तसेच युवकांना उद्योगधंद्याकडे वळवण्याच्या दृष्टीने करत असलेले सहकार्य व मार्गदर्शन हे युवकांना लाभदायक ठरत आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील युवक हा बापूंच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असेच दिसून येत आहे.
     दिलीप बापूंची दुसरे सहकारी मित्र नागेश काका भोसले यांचेदेखील कार्य येथील स्थानिक जनतेला माहित आहे. सदैव मदतीचा हात पुढे करणारा व्यक्ती म्हणून तसेच एका फोनचा कॉलवर मदतीला धावून येणारा हा नागेश काका म्हणून नागेश भोसले यांची ख्याती आहे. पंढरपूर शहरातील नगरपालिका अंतर्गत कोणतेही काम असो ते काम तडीस नेण्याचे साठी सातत्याने प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नागेश काकांची ओळख आहे. प्रचंड जनसंपर्क असलेले हे नागेश काका हे उद्याच्या येणाऱ्या पंढरपूर नगरपालिका निवडणूक मध्ये प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहण्याच्या च्या भूमिकेत आहे. तसेच या बापू काका जोडीला मदतीसाठी म्हणून भालके गट कल्याण काळे गट तसेच अन्य प्रस्थापित विरोधी राजकीय गट सामाजिक गट हे बापू आणि काकांच्या पाठीशी उभे राहणार असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.
     पत्रकार दिनाच्या निमित्ताने दिलीप धोत्रे बोलत असताना म्हणाले पत्रकार बांधवांनी आज पर्यंत माझ्या सामाजिक कार्यास तसेच अन्य राजकीय कार्यास भरभरून प्रसिद्धी दिली कामाचे कौतुक केले. अशीच कौतुकाची थाप असेच आशीर्वाद पुढील कालावधीमध्ये देखील आमच्या पाठीशी असावेत अशी अपेक्षा या पत्रकार दिनाच्या निमित्ताने व्यक्त केली.
     पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार दैनिक पंढरी संचार चे संस्थापक संपादक बाळासाहेब बडवे यांनी आपल्या मनोगतामध्ये पत्रकारां विषयी तसेच पत्रकारिता बाबतीत देखील आपले विचार व्यक्त केले. पत्रकारांनी आपले मन स्वच्छ ठेवावे ज्याप्रमाणे  मन स्वच्छ ठेवले आहे त्याच प्रमाणे आपले हात देखील स्वच्छ ठेवावेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकाराला त्याच्या कार्याची दखल हा समाज घेत असतो.
पत्रकारांनी समाजामधील अन्याय अत्याचार भ्रष्टाचार तसेच शासकीय घोटाळे शहराच्या विविध विकास कामाच्या बाबतीत जागरूकपणे आपली भूमिका आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडावी एखादा राजकारणी चुकत असेल तर त्याच्यावर जरूर टीका करावी. जर एखादा राजकारणी चांगलं कार्य करत असेल त्याच्या कार्याचा गुणगौरव देखील पत्रकारांनी करायला हवा. असे आपल्या मनोगतामध्ये ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी विचार व्यक्त केले.
    या पत्रकार दिनाच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील अनेेक राजकीय नेतेमंडळी तसेच नगरसेवक व कार्यकर्ते हे या कार्यक्रमास उपस्थित होते.