पोलीस वसाहतीमधील समश्यासाठी हालगीनाद आंदोलन ! माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सह मित्र पक्षही सामील

पोलीस वसाहतीमधील समश्यासाठी हालगीनाद आंदोलन ! माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सह मित्र पक्षही सामील

प्रतिनिधी  पंढरपूर पंढरपूर येथील पोलिस वसाहतीमधील पोलिसांच्या निवासस्थानाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे गटारी तुंबलेले आहेत छतावरची कवले फुटलेले आहेत दरवाजे खिडक्या यांची अवस्था अत्यंत नादुरुस्त झालेली आहे झाडेझुडपे वाढलेली आहेत गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग या देखभाल दुरुस्ती कडे कुठले लक्ष देत नाही अनेक ठिकाणच्या कार्यालयाची व मंत्र्याच्या दौर्याच्या वेळी रस्त्याच्या दुरुस्त्या   अधिकार्याच्या जवळच्या  ठेकेदाराना जगवण्यासाठी वेळोवेळी केल्या जातात परंतु  कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड काम करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांकडे कोणीही लक्ष देत नाही याठिकाणी झाडेझुडपे वाढलेले आहेत जप्त केलेली वाहने या ठिकाणी लावले लावल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे प्रशासनातील इतर विभागातील कर्मचारी कोरोणाच्या काळामध्ये शासनाच्या पगारी घरी बसून घेत असताना चोवीस तास काम करणाऱ्या पोलिसांची ही अवस्था होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची अवस्था काय असेल या विषयाकडे सरकारने गंभीरतेने पहावं यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी हलगी नाद आंदोलन करण्यात आले दोन दिवसाच्या आत कामाला सुरुवात नाही झालेतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावडेसौ यांच्या कार्यालयात उग्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी बोलताना माऊली भाऊ  हळणवर  यांनी दिला
बुधवार सकाळी ११वाजता पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय ला समोर हालगीनाद आंदोलन करण्यात आले  यावेळी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश सचिव  माऊली भाऊ हळणवर  जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के न.पा बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट रयत क्रांती संघटनेचे दिपक भोसले यावेळी बांधकाम विभागाचे उप अभियंता एस. व्ही गुंड यांनी पोलिस वसाहतीतील दुरुस्तीची कामे दोन दिवसात सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे हलगीनाद आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी  बबन येळे अक्षय बोरकर सतीश वसेकर महेश गुंड नवनाथ कोले लक्ष्मण चव्हाण आप्पा गुंड रोहित गुंड सचिन कोळेकर भाजप व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते