*दत्तात्रय खंदारे यांची अंकलिपी राज्यासाठी एक आयडॉल – डॉ. बिभीषण रणदिवे*

करकंब/ प्रतिनिधी
- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन शिक्षण असल्याने करकंब येथील करकंब केंद्रातील मुली नं.2 मधील आदर्श मुख्याध्यापक असलेले दत्तात्रय खंदारे यांनी मुलांना आवडणारे आणि मुलांना त्याची खुपच उत्सुकता असलेले सहज, सुलभ, सोप्या भाषेत असे एक समाज्याचील वंचित व सर्वच घटकातील मुलांसाठी उपयोगी असणारी अंकलिपीची निर्मिती करुन ही अंकलिपी राज्यासाठी एक आयडॉल ठरेल असे मत शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांनी व्यक्त केले.
यावेळी केंद्र प्रमुख आप्पासाहेब माळी, आदर्श शिक्षक अंकलिपीचे प्रवर्तक दत्तात्रय खंदारे, चंद्रकला खंदारे, सिध्देश्वर लेंगरे, मुख्याध्यपक हेमंत कदम, पत्रकार सागर थिटे आदि उपस्थित होते. पुढे बोलताना या अंकलिपीमुळे विद्यार्थ्यांना वाचनासाठी लेखनासाठी उपयुक्त असे विविध प्रकारच्या शब्द संग्रहाचा खजिना असलेले विविध प्रकारचे जोडाक्षरे याचा अमाप प्रज्ञा मराठी अंकलिपी हे पुस्तक केवळ सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक कार्य म्हणून समाज हितासाठी केले असलेचे मत रणदिवे यांनी सांगितले.