*पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचा वाढदिवसानिमित्त करोळे ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान व सत्कार......!*

करकंब /प्रतिनिधी:
-करकंब पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनीआपल्या कार्यकालात कामातून लोकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची पदोन्नतीने नागपूर व इतर महाराष्ट्रात कार्यकाल पूर्ण केल्यानंतर सध्या ते सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव येथे कार्यरत असून यांच्या वाढदिवसानिमित्त करोळे ता पंढरपूर येथील उपसरपंच आजिनाथ गायकवाड यांनी करोळे ग्रामस्थांच्यावतीने विशेष सन्मान व सत्कार केला.
यावेळी या वाढदिवसानिमित्त पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचा विशेष सन्मान व सत्कार करोळे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला .या कार्यक्रमास उपसरपंच अजिनाथ गायकवाड, करोळे येथील ग्रामस्थ अधिकारी पदाधिकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.