*शनिवारी पंढरीत मराठा समाजाची बैठक* *मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील लाँग मार्चची तयारी बाबत होणार चर्चा*

पंढरपूर/प्रतिनीधी
मराठा समाजाला ओबोसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20जानेवारी रोजी मुंबई येथे लाँग मार्च निघणार आहेत. त्या अनुषंगाने पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे.
सदरची बैठक शनिवार दि १३जानेवारी रोजी सायं ४:३०वाजता होणार आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर जिल्हा मुख्य समन्वयक माऊली पवार, राजन जाधव, पद्माकर काळे, पुरुषोत्तम बरडे, नागेशकाका भोसले यांचे सह सोलापूर जिल्ह्यातील अनेक जण उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीसाठी पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पंढरपूर येथील स्टेशन रोड, सावरकर पथ जवळील संत तनपूरे महाराज मठ येथे अगदी वेळेवर उपस्थित राहावे . असे आवाहन सकल मराठा समाजाचे वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.