*आज पाटील ,पवार ,रोंगे यांच्या परिवर्तन आघाडीच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ* *सरकोली येथे होणार भव्य बैठक*

*आज पाटील ,पवार ,रोंगे यांच्या परिवर्तन आघाडीच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ*  *सरकोली येथे होणार भव्य बैठक*

पंढरपूर/प्रतिनीधी

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे.या निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासोबत असलेल्या रोंगे, आणि दिपक पवार यांच्या एकत्रित आघाडीतील उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आज मंगळवारी सायंकाळी ५वाजता रांजणी येथील शंभू महादेवास नारळ फोडून होणार आहे.त्यानंतर सायंकाळी ७वाजता सरकोली येथे भव्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
  या निवडणुकीत वरील आघाडीचे सहकार शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे पॅनल निवडणूक रिंगणात आहे. यामुळे दुरंगी लढत लागली आहे.
   काल सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यामध्ये अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे तिरंगी लढतीपेक्षा जास्त उमेदवार अर्ज दाखल केले असतानाही वरील आघाडी झाल्याने ही निवडणूक दुरंगी झाली आहे. 
   वरील आघाडीने या निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी फार दिवसापासून तयारी केली आहे. विविध भागातून बैठक आणि सभासद भेटी घेतल्या आहेत. सत्ताधारी काळे गटास कपबशी तर या परिवर्तन आघाडीस घड्याळ हे चिन्ह मिळाले आहे. यामुळे आता या घड्याळ चिन्हाचा आणि उमेदवारांचा प्रचार आजपासून सुरू होणार आहे.