*ज्ञानदीप मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*

*ज्ञानदीप मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*

करकंब /प्रतिनिधी:-
               नांदोरे येथील जयहिंद प्रतिष्ठान नांदोरे संचालित ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र लवंग येथील डॉ. सौ. मेधा गायकवाड या अध्यक्ष म्हणून लाभल्या. व प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच सौ. स्वाती पाटील , डॉ. सौ. रोहीणी भिंगारे ,सौ. रेश्मा नाईकनवरे या  उपस्थित होत्या.  कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
यानंतर उपस्थित माता पालक सौ. सविता भिंगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उमा वाघमारे, पुनम व्यवहारे , लक्ष्मी पाटील यांनी  आपले  मनोगत व्यक्त केले.तसेच संस्थेच्या मुख्याध्यापिका नसरीन तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वात शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनेबद्दल  मोलाचे मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता साबळे  प्रास्ताविक   सुवर्णा गायकवाड व. आभारप्रदर्शन लक्ष्मी पाटील यांनी केले.