*दिपकआबा साळुंखे यांचा प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कडून सत्कार*

. पंढरपूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार दिपकआबा साळुंके यांची नवी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग- व्यापार विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांच्या वतीने आज पंढरपूर येथील शासकीय विश्रामग्रहावरती भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदावरती काम करत असताना पक्षाला जिल्ह्यामध्ये मजबुत स्थीतीमध्ये आणण्यात दिपक आबा यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पवार साहेबांच्या निष्टावंत मावळ्यापैकी दिपक आबा यांच नाव देखील अवर्जुन घेतलं जातं. संघटनात्मक कामाचा असलेला प्रदिर्घ अनुभव तसेच नवी-मुंबई आणि परिसरात पश्चिम महाराष्ट्रातील अनेकजन वास्तव्यास असल्यामुळे त्यांच्या सोबत असणारे आबांचे घनिष्ट संबध पाहता येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला निश्चित होणार असुन पक्ष संघटनेत आबांच्या कामाचा अनुभव पहाता नवी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं चांगलं मजबुत संघटन परत नव्याने उभे करतील याचा नक्की विश्वास वाटतो .
महाविकास आघाडीतील नेत्यासोबत असणारे त्यांचे सलोख्याचे संबध पाहता त्या सर्वासोबत व्यवस्थीत समन्वय साधत पक्षाने दिलेल्या जबाबदारीला आबा योग्य प्रकारे न्याय देऊन आपल्या कामाच्या बळावरती नवी मुंबई येथे पक्षाला वेगळी ओळख निर्माण करून देतील याचा पूर्ण विश्वास वाटतो पक्षाने आगदी योग्य व्यक्तीची त्या जागी नियुक्ती केली असुन श्रेष्ठींना अभिप्रेत असणारं कार्य आबांच्या हातून नक्कीच घडेल असे नागेश फाटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगीतले .
यावेळी प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे सह पदाधिकारी उपस्थित होते .