*शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत विविध कार्यक्रम* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या अनेक शाखा उद्घाटनचे आयोजन*

पंढरपूर/प्रतिनीधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये वरील विभागाच्या वतीने विविध गावामधे शाखा उद्घाटन करण्यात येणार आहेत. तसेच गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथीलवृद्धांना मिष्ठांन भोजन देण्यात येणार आहे.
सोमवार दि 12 डिसेंबर रोजी वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 9: 30वाजता गादेगाव, सकाळी 10वाजता कोर्टी, तर बोहाळी येथे सकाळी 10:30वाजता उद्योग व व्यापार विभागाच्या शाखा उद्घाटन करण्यात येणार आहेत. सायंकाळी सात वाजता मातोश्री वृध्दाश्रम येथे भोजन देण्यात येणार आहे
.
वरील सर्व कार्यक्रमासाठी सहकार शिरोमनीचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, शहर अध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेश सचिव कल्याण कुसुमडे, जिल्हाध्यक्ष मयूर काळे, जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब नागटिळक, सुभाष बागल, रामदास गिडे, चंद्रकांत जाधव, विक्रम बागल, डॉ. सूर्यकांत बागल, संतोष शिंदे, उमेश सासवडकर, विश्वास सुरवसे, संजय बागल, कुबेर हजारे, विनोद बागल, अशोक काळे, आदीसह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
वरील सर्व कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या विविध विभागाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने तालुकाध्यक्ष उमेश सासवडकर यांनी केले आहे.