*गायक वैभव केंगार यांनी जिंकली पंढरपूरकर रसिकांची मने*

पंढरपूर:प्रतिनिधी
*कै. पुरुषोत्तम काका खडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित द्वितीय मासिक संगीत सभेत गायक वैभव केंगार यांच गायन आयोजित करण्यात आले होते.सुरूवातीला कै.पुरुषोत्तम काका खडके यांच्या प्रतिमेचे पूजन श्री रामदास रोंगे.अरविंद अराध्ये.हरिदास लिमकर.भाऊ मनमाडकर शुभांगीताई मनमाडकर याचे शुभहस्ते होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला गायक वैभव केंगार यांनी राग मारवा विलंबित एकतालातील बडा ख्याल अब मोपे कृपा करो रे राम गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.तीनतालातील गुरुबिन ग्यान ना पावे व बंगरी मोरी मुरख गई छांडो ना व बागेश्री रागातील सुंदर बंदिश गाऊन गजल सप्तसुर माझे.हंगामा है क्यू बरपा. गाऊन शेवटी धन्य भाग सेवा का भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना तितकिच सुंदर समर्पक तबला साथ माऊली खरात व हार्मोनियम श्रीरंग जाखी तर तानपूरा साथ सुदर्शन कुंभार यांनी केली.तत्पूर्वी सर्व कलाकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पंढरपूर मधिल कलारसिक कोरोनाचे नियम पाळून आवर्जून उपस्थित होते.मिलिंद जोशी. प्रवीण खडके.पल्लवी जवळे मँडम.पारूल परमार.आरतीताई परिचारक.असावरी पटवर्धन. निता कुलकर्णी. प्रसाद कुलकर्णी. नामदेव खरात.साठेसर.अरविंद लिमये.राजेंद्र कुलकर्णी. संकेत कुलकर्णी. धनंजय रोंगे.संतोष कुलकर्णी. एन एन कुलकर्णी.आप्पासाहेब चुंबळर.सुहास इचंगावकर.रामेश्वर जाधव.निलेश आराध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुंदर सांऊड सीस्टीम व्यवस्था भैय्या मनमाडकर यांनी संभाळली.पुढील मासिक सभा १९ सप्टेंबर पुण्यातील ख्यातनाम गायिका शिवंजनी शिवाजी आदलिंगे यांची असून याही सगीत सभेला उपस्थित रहावे असे अवाहन आयोजकांच्या वतीन करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधुरीताई जोशी यांनी करून शेवटी ज्ञानेश्वर दुधाणे यांनी आभार मानले.*