*सतत बंद केल्यामुळं लोक हलाकित जगत आहेत जीवन* *शासनाच्या उपायोजना पडत आहेत कमी*
.करकंब/ प्रतिनिधी.
कोरणाच्या महामारी मुळे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक मात्र आहेत संकटात.
शासनाने वारंवार बंद त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा बंद पालकमंत्र्यांचा बंद ग्रामपंचायत प्रशासनाचा बंद व्यापाऱ्यांना आता फार आर्थिक संकटात सापडले आहे व्यापाऱ्यांकडून आता बंदला तीव्र विरोध दर्शवला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा बंद होणार पाच दिवस झाले तोपर्यंत पुन्हा करकम बंद होणार त्यामुळे करकम आणि करकम परिसरातील लोकांमध्ये आता अडचण निर्माण होत आहे शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या अडचणी फवारण्या व्यापारी ऐन सणासुदीच्या दिवसात संकटात सापडला आहे प्रशासन उपायोजना याकडे लक्ष कमी पडत आहे.
जास्तीत जास्त लसीकरण करून वर तपासण्या करून व्यापाऱ्यांना सवलत देऊन हा बंद न ठेवता शासनाच्या नियमानुसार बदल करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे
चौकट-:
लोकांचे खाजगी गाळा भाडं कुठून द्यायचं?
ज्याचा उदरनिर्वाह
चप्पल व्यापारी लॉन्ड्री कापड दुकान कटिंग,वडापाव,चहा वरती आहे त्यानं पैसा कुठून आणायचा
शाळेची फी थांबली आहे का..?घर खर्च तेल मीठ थांबलं का?
दवाखान्याला लाखोंचा खर्च कुठून करायचा?
घराच्या बाहेर पडल्यावर खर्चाचा मीटर चालू होतो कुठून आणायचा पैसा
बँक हफ्ते कुठून भरायचे...
ते थांबले का?
महावितरण लाईट तोडत आहे कुठून आणायचा पैसा
कापड व्यापारी
मुकुंद कपडे कर.
सर्वसामान्य नागरिकांना आता प्रश्न पडला आहे फक्त किराणा दुकान मेडिकल आणि भाजीविक्रेत्या दुकाने चालू आहेत आता इतर व्यवसाय बंद करून अनेक जण या व्यवसायाकडे वळले आहेत खरंच उपासमारीची वेळ आली आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
बंदला शिथिलता द्यावी व जास्तीत जास्त लसीकरण करून व्यापार सुरळीत सुरू करावे व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे
युवाशक्ती प्रवक्ते सचिन शिंदे करकम