*न्यू इंग्लिश स्कूल  व स्व.दत्तात्रय खारे  करकंब  यांच्या संयुक्त विद्यमानाने  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हिरकणी पुरस्कार प्रदान .*  

*न्यू इंग्लिश स्कूल  व स्व.दत्तात्रय खारे  करकंब  यांच्या संयुक्त विद्यमानाने  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हिरकणी पुरस्कार प्रदान .*  

करकंब /प्रतिनिधी :-

 येथील चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल स्कूल व स्व. दत्तात्रय खारे यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हिरकणी पुरस्कार करकंब येथील समाजामध्ये कुटुंबाला आदराचे व मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या सहा महिलांना सन्मान पुरस्कार सोहळा नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

          न्यू इंग्लिश स्कूल मध्ये हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूरच्या आरटीओ अधिकारी - पल्लवी पांडव व ऐश्वर्या धलु   तर        अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष - संजीव कुमार म्हेत्रे सर उपस्थित होते. 
          याप्रसंगी करकंब  व करकंब  परिसरातील ज्या महिलांनी आपल्या कुटुंबासाठी आपले जीवन चंदनाप्रमाणे झिजवून कुटुंबाला समाजामध्ये आदराचे व मानाचे स्थान मिळवून दिले. अशा सहा सन्मान मूर्तींचा यावेळी सावित्रीबाई फुले हिरकणी पुरस्काराने  सन्मान करण्यात आले. यामध्ये सौ .काशीबाई रामचंद्र शिंदे, स्व . सिंधुताई कापसे,   शेवंता दगडू जाधव, श्रीमती -सुभद्राबाई शिंदे, सौ. शालन अंकुश व्यवहारे , सौ .सुनीता ज्योतीराम  सिदवाडकर या महिलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  व्याख्याते -रणदिवे सर यांनी स्वातंत्र्यपूर्व शिक्षण व स्वातंत्र्यानंतरचे शिक्षण यावर आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले.तसेच पांडव मॅडम यांनी कठीण परिस्थितीचा सामना करत कशाप्रकारे आपण घडलो हे सांगत असतानाच सावित्रीबाई फुले यांचा आदर्श सर्वानी घ्यावा. अशा प्रकारचे मनोगत व्यक्त तसेच.  करकंबच्या नवोदित भागवताचार्य राणी सिदवाडकर यांनी आपल्या मधुर वाणीने महाभारत, रामायण यातील अनेक दाखले देऊन मुलांना मंत्रमुग्ध तसेच. आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष संजीव कुमार म्हेत्रे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मुलांनी उत्तुंग यश संपादन करावे अशा प्रकारचे आव्हान केले. या कार्यक्रमाला स्व.दत्तात्रय खारे मित्र मंडळाचे- सतीश खारे, अरुण बनकर तसेच अभिछया प्रतिष्ठानच्या संचालिका- सौ सुरेखा अमोल शेळके, सौ शुभांगी शेळके ,पत्रकार लक्ष्मण जाधव ,स्कूल कमिटी अध्यक्ष वेळापूरकर सर , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे,  सुपरवायझर शिंदे मॅडम व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व ज्यांचा सन्मान झाला त्त्यांचे सर्व कुटुंब उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका - करमाळकर मॅडम यांनी केले. तर आभार संस्थेचे सचिव- अविनाश देवकते सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले.