*करकंब विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी-लक्ष्मण जाधव तर कार्याध्यक्षपदी-डॉ. नितीन खाडे यांची निवड*.

करकंब/ प्रतिनिधी :
-येथील करकंब विभाग पत्रकार संघाची 2022-23कार्यकारणी बैठक करकंब पत्रकार विभागाचेअध्यक्ष-शहाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मागील वर्षाचा आढावा घेऊन सर्व इतिवृत्तान्त करकंब विभागाचे राजेंद्र करपे यांनी वाचून दाखविला.
यावेळी सन 2023 या वर्षासाठी करकंब विभाग पत्रकार संघाच्या कार्यकारणी निवडी संदर्भात चर्चा करून करकंब विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष शहाजी काळे-यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या करकंब विभाग पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी-लक्ष्मण जाधव, कार्याध्यक्षपदी-डॉ. नितीन खाडे, उपाध्यक्षपदी-बाळासाहेब काशीद (भोसे), सचिव-गोपीनाथ देशमुख, खजिनदार-लक्ष्मण शिंदे यांची सर्वानुमते व खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली.
यावेळी करकंब विभाग पत्रकार संघाचे शहाजी काळे, अतुल अभंगराव ( सर), सूर्यकांत बनकर ( सर),विश्वनाथ केमकर (सर), सचिन शिंदे, सागर थिटे(सर), अण्णासाहेब पवार, मनोज पवार, राजेंद्र करपे, ऋषिकेश वाघमारे, गणेश माने, रोहन नरसाळे, मोहन कोळी ,धीरज शिंदे सह सर्व सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन करून नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.