*करकंबमध्ये  देशमुख बंधू मध्ये वादाची ठिणगी...!. गावात मात्र  चर्चा चालू आहे, आता तरी वाजू द्या विकासाची हलगी...*...!

*करकंबमध्ये  देशमुख बंधू मध्ये वादाची ठिणगी...!. गावात मात्र  चर्चा चालू आहे, आता तरी वाजू द्या विकासाची हलगी...*...!

करकब/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील लोकसंख्येने पहिल्या क्रमांकाचे गाव म्हणून ओळख असलेल्या करकब गावाचा विकासकामात मात्र कितवा क्रमांक आहे. हे समजत नसले तरी एकमेकांवर आरोप करण्यात मात्र दोन्ही देशमुख बंधुमध्ये वादाची  ठिणगी पडली आहे. त्यामुळे देशमुख बंधू मध्ये वादाची ठिणगी.... गावात चर्चा आहे,आता तरी वाजू द्या विकासाची हलगी......!
*ग्रामपंचायतमुळे गावच्या विकासाचा झाला खेळ-: बाळासाहेब देशमुख*   ग्रामीण भागाचा विकासाचा पाया असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांमध्ये आता राजकीय दबावतंत्र सक्षम पणे काम करीत असून राज्य सरकारने कितीही पारदर्शकपणे हाक दिली तरी त्याला पळवाट व बगल कशी द्यायची याबाबतीत गावातील ग्रामपंचायत च्या सत्ताधाऱ्यांना चांगले जमले असून अशा नाकर्तेपणामुळे करकब गावच्या विकासाचा खेळ केला आहे असा थेट आरोप सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी केला आहे.


              यापूर्वी दिनांक२०/१/२०२१रोजी   माननिय उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांना मा .महिला व बालकल्याण सभापती रजनीताई देशमुख यांचे फंडातून जिल्हा परिषद स्थर पंधराव्या वित्त आयोगातून सन २0२०-२०२१ अंतर्गत बंदित व बंदित कामे मंजूर करणेबाबत साठी शिफारस केलेली होती. यामध्ये वार्ड क्रमांक चार मधील व्यवहारे गल्ली येथील गजानन कुरणावळ दुकान ते व्यवहारे गल्ली, कदम घर लहू सुतार घर ते रेपाळ घर मारुती मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या रस्त्यासाठी दहा लाख रुपये तसेच वार्ड नंबर 6 मधील महिला जिल्हा परिषद सदस्य असलेल्या या नात्याने विशेषता महिलांसाठी सुलभ शौचालय करावे या हेतूने इंदिरानगर झोपडपट्टी येथील सार्वजनिक शौचालय युनिट बांधणे व विंधन विहीर घेणे यासाठी पाच लाख रुपये मंजूर केले. तर विष्णू रंगनाथ धोत्रे यांच्या घरा शेजारी सार्वजनिक शौचालय बांधणे व विंधन विहीर घेणे यासाठी पाच लाख रुपये मंजूर केले. याबाबतची प्रशासकीय मान्यता येऊनही करकंब ग्रामपंचायत कागदपत्रांची पूर्तता करत नसल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या सदस्य व महिला बालकल्याण च्या माजी सभापती रजनीताई देशमुख व ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी पंढरपूर यांच्याकडे दिनांक २३/९/२०२१रोजी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जर यापुढे ग्रामपंचायत ने मंजूर विकास कामांमध्ये गावच्या विकासात खेळ करत असेल ग्रामस्थांच्या प्रचंड मोर्चा घेऊन ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ता हे सर्वस्व नाही हे समजून लोकांची सामाजिक बांधिलकी जोपासण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी करावी अन्यथा येणाऱ्या भविष्य येणारा काळ सर्वसामान्य जनताच योग्य जागा दाखवेल.
 *करकंबच्या विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांना जनतेनेच योग्य जागा दाखवली-: आदिनाथ देशमुख* गावातील आणि वाड्या वस्ती वरील सर्वसामान्य जनताही आमच्या पाठीशी काल ही होती आजी आहे उद्याही असणार आहे याची आम्हाला तमा नाही, पण तो गेल्या दहा-पंधरा वर्षात च्या काळामध्ये जिल्हा परिषद च्या माध्यमातून ग्रामपंचायत च्या माध्यमातून या लोकांनी सातत्याने विकास कामांमध्ये अडथळे आणून तक्रारी करून विकासाचा खेळ  याच लोकांनी केल्यामुळे करकंब च्या जनतेनी त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे.
   
    जिल्हा परिषद स्थर फंडातून आमच्या ग्रामपंचायत कडे कुठलेही प्रशासकीय पत्र अजून पर्यंत आलेले नाही. जरा आले तरी या बाबत सकारात्मक चर्चा करून विकासाच्या बाबतीत आम्ही कोणतीही अडथळा यापूर्वी केला नव्हता आणि पुढेही करणार नाही असे यावेळी मा सरपंच व उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी सांगितले.


    विकास काम करत असताना सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही अडवणूक व विकास कामाची अडवणूक आजपर्यंत केली नाही. यामुळेच सामान्य जनतेने पुन्हा ग्रामपंचायतच्या या पवित्र मंदिरात बहुमताने निवडून दिलेले आहे. या ग्रामपंचायतच्या ज्ञान मंदिरातून आम्ही कधी विकासाची खिळ व खेळ केला नाही. उलट याच जिल्हा परिषद सदस्यांनी शंभर गाळे अडवून गावातील बेरोजगार असलेल्या चे संसार उध्वस्त करण्याचे महापाप केले. असा थेट आरोप यावेळी माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी यावेळी केला.