*शंभर वर्षाहून अधिक काळ सामान्य शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची परंपरा  सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जपली* *कृषी रत्न  रामदास खराडे पाटील यांचे प्रतिपादन*

*शंभर वर्षाहून अधिक काळ सामान्य शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची परंपरा  सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जपली*  *कृषी रत्न  रामदास खराडे पाटील यांचे प्रतिपादन*

करकंब /प्रतिनिधी ;

- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नुकताच104 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 8 मार्च 1918 ला स्थापना झालेल्या या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आज 104 वर्ष पूर्ण झाले असून शंभर वर्षाहून अधिक काळ सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबरच अनेक जणांच्या जिव्हाळ्याची व शेतकऱ्यांच्या हिताची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही आजही विश्वासावर पात्र ठरल्याचे मत कृषी रत्न पुरस्कार प्राप्त रामदास खराडे यांनी व्यक्त केले. सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र कृषी रत्न पुरस्कार प्राप्त लोकनेते रामदास खराडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी      विविध कार्यकारी सोसायटीचे उजनी श्री चंदूकाका पाटील,  रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वय श्री विठ्ठल मस्के, श्री रुपेश वाघमारे ,हनुमंत साळुंखे, चेअरमन विकास सेवा सोसायटी नगोली श्री दत्तात्रय साळुंके बुवा सचिन मोरे ,आकाश मोरे, नवनाथ महाडिक, साईराम कृषी भांडार टेंभुर्णी, समाधान काळे गव्हर्मेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर तसेच वकील महिला बचत गटाच्या सभासद  व इतर महिला सभासद उपस्थित होत्या.

यावेळी खराडे म्हणाले की आज डीसीसी बँक एकशे चार वर्षे पूर्ण झाली असून शेतकऱ्यांची बँका म्हणून या बँकेस ओळख प्राप्त झाली आहे. ही बँक ग्राहकांना आपुलकीने तर त्याने जपणारी बँका या बँकेचे जिल्हा प्रशासक म्हणून श्री शैलेशजी कोथमिरे साहेब यांनी या बँकेत नवजीवन प्राप्त करून दिले आहे तसेच या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 400 कोटींच्या ठेवी गोळा केल्या त्याबद्दल बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासक शैलेश  कोथमिरे  यांचा विशेष सन्मान व सत्कार चा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. या अनुषंगाने खराडेपाटील यांनी श्री शैलेशजी कोथमिरे यांचे अभिनंदन केले .बँकेच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी  बँक इंस्पेक्टर शाखा भिमानगर श्री मोहन ननवरे साहेब शाखा अधिकारी भिमानगर श्री पंडित निकम साहेब  भिमानगर शाखा क्लार्क श्री नानासाहेब चंदनकर भिमानगर शाखा क्लार्क सौ.बनसोडे मॅडम भिमानगर शाखा शिपाई 
श्री नानासो देवकर कार्यक्रमासाठी अनेक शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.