*करकंब नगरपंचायत ची आशा मावळली*....?

*करकंब नगरपंचायत ची आशा मावळली*....?

करकंब/ प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाला मुदत संपलेल्या व नवनिर्वाचित नगरपरिषदा, व नवनिर्वाचित नगरपंचायत च्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे यापूर्वीच नुकतेच आदेश दिले होते. त्यातच करकंब व टेंभुर्णी यासारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांचा नगरपंचायत चा प्रस्ताव नगर विकास मंत्रालया धूळ खात पडून असल्यामुळे करकंब नगरपंचायत कधी होणार याकडे जरी करकंब करांचे लक्ष लागून राहिले असले तरी करकंब नगरपंचायत ची आशा लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे मावळते की काय अशी चर्चा सुरू आहे.
करकंब हे पंढरपूर व माढा तालुक्यातील राजकीय राजधानी आहे. असे असले तरी प्रत्येक निवडणुकीच्या कार्यकालात जनतेला दिशाभूल करणारी मोठी आश्वासने दिली जातात परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मात्र केली जात नाही. भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे आमदार बबन दादा शिंदे, जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक, विठ्ठल परिवाराचे भगीरथ भालके, कल्याणराव काळे, तसेच करकम मधील जनतेने निवडून दिलेले 17 सदस्य, करकंब मधील आजी माजी पदाधिकारी, त्यातच सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर असलेले करकम मधील जिल्ह्याचे पदाधिकारी, यांनीही याबाबत विशेषता लक्ष घातले पाहिजे.
करकंब नगरपंचायत झाल्यास करकंब चा निश्चितच कायापालट होईल असे सुज्ञ नागरिक व्यापारी वर्ग शेतीविषयक असणारे उद्योजक सर्वसामान्य नागरिक यांच्या मधून बोलले जात आहे.