*सोलापूर जिल्ह्यात करकंब ग्रामीण रुग्णालयात विक्रमी 855 जणांचे लसीकरण*

*सोलापूर जिल्ह्यात करकंब ग्रामीण रुग्णालयात विक्रमी 855 जणांचे लसीकरण*

 करकंब /प्रतिनिधी

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच तिसरी लाटेचा संभाव्य धोका ओळखून शासनाने वेळोवेळी सूचना केल्या त्याचे तंतोतंत पालन करकंब ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत पोलीस स्टेशन यांनी काळामध्ये चांगल्या प्रकारे केले असे असले तरी करकम ची लोकसंख्या पाहता करकंब मध्ये जास्तीत जास्त लसीकरण होण्याची गरज होती, त्यानुसार आज आज करकम ग्रामीण रुग्णालयात विक्रमी 855 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यापूर्वी रक्षाबंधन दिवशी दोनशे महिलांचे तसेच आज पर्यंत गेल्या चार दिवसात विक्रमी असे चौदाशे पाच जणांचे लसीकरण केले आहे. या लसीकरणा साठी करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सरवदे तसेच या ग्रामीण रुग्णालय ची सर्व टीम, करकंब ग्रामपंचायतचे सरपंच सौ तेजमाला शरच्चंद्र पांढरे व त्यांचे सर्व सहकारी सदस्य, महिला बालकल्याण च्या माजी सभापती रजनी देशमुख, विरोधी पक्षनेते राहुल काका पूरवत, विविध पदाधिकारी, आजी-माजी सदस्य सामाजिक संघटना यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा चे करकंब ग्रामीण रुग्णालयामध्ये विक्रमी असे 855 जणांचे लसीकरण झाल्यामुळे करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सरवदे, व या रुग्णालयातील त्यांच्या सर्व टीमचे करकंब व करकंब परिसरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.    या लसीकरणात करकंब नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. आज पर्यंत गेल्या चार दिवसात चौदाशे पांच नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून करकंब गावची लोकसंख्या पाहता अजून लसीकरण होण्याची गरज आहे त्यासाठी नागरिक, वाड्या वस्त्या वरील लोकांनी विशेषता पंचेचाळीस ते 70 वयोगटातील लोकांनी, शेतमजूर शेतकरी व्यापारी, नागरिक व सर्वांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आज सोलापूर जिल्ह्यात करकंब ग्रामीण रुग्णालयांमध्ये विक्रमी असे 855 जनाचे लसीकरण झाले असून करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सरवदे व त्यांची सर्व टीम तसेच करकंब ग्रामपंचायत व व सर्व टीम यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याचे सरपंच सौ तेजमाला शरदचंद्र पांढरे यांनी सांगितले.